ETV Bharat / state

Ashok Chavan Criticized Raj Thackeray : 'राज ठाकरे विकासावर न बोलता केवळ भोंग्यांवरून जातीय तेढ निर्माण करत आहेत' - Hanuman Chalisa Contraversy

राज ठाकरे ( Raj Thackeray ) विकास कामाबद्दल न बोलता केवळ भोंगे आणि हनुमान चालीसा अशा मुद्यांच्या आधारावर जातीय तेढ निर्माण करत आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात अस्थिरतेचं वातावरण निर्माण होत आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा बांधकाममंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavan Criticized Raj Thackeray ) शुक्रवारी दिली. तसेच मराठा आरक्षणासह ( Maratha Reservation ) त्यांनी देशातील महागाई ( Inflation In India ) आणि पेट्रोल-डिझेलच्या ( Petrol Disel Price Hike ) वाढत्या दरावरूनही केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.

Ashok Chavan Criticized Raj Thackeray
Ashok Chavan Criticized Raj Thackeray
author img

By

Published : Apr 29, 2022, 5:21 PM IST

अहमदनगर - हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa Politics ) हा काय दुसऱ्याच्या घरासमोर म्हणायचा विषय आहे का? तो श्रद्धेचा विषय असून प्रत्येकाने तो आपापल्या घरात पठण केला तर चांगलेच आहे. मात्र, राज ठाकरे ( Raj Thackeray ) विकास कामाबद्दल न बोलता केवळ भोंगे आणि हनुमान चालीसा अशा मुद्यांच्या आधारावर जातीय तेढ निर्माण करत आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात अस्थिरतेचं वातावरण निर्माण होत आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा बांधकाममंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavan Criticized Raj Thackeray ) शुक्रवारी दिली. ते साईंचे दर्शन घेण्यासाठी ( Ashok Chavan In Shirdi ) शिर्डीत आले होते.

अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

काय म्हणाले अशोक चव्हाण - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ भाजपा व्यतिरिक्त असणाऱ्या राज्यांना पेट्रोल, डिझेल यावरील कर कमी करण्याचा मुद्दा चुकीचा असून केंद्र सरकारने जीएसटीची हजारो कोटी रुपयांची रक्कम अजूनही महाराष्ट्राला दिली नाही. मुळातच पेट्रोल, ( Petrol Disel Price Hike ) गॅस आणि ऑइल हे खाते केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांनी यावर निर्णय घेणे अपेक्षित आहे. मात्र यासाठी केवळ राज्याला जबाबदार धरणे चुकीचे आहे. कायदा सर्वांना सारखाच आहे. मात्र, देशद्रोहाचा कायदा हा जाचक असून त्यात बदल करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न - विरोधकांनी विरोध हा तत्वाच्या आधारावर केला पाहिजे. केवळ सद्य परिस्थितीमधील सर्वसामान्य जनतेचे प्रश्नावर भाष्य न करता केवळ जातीय तेढ निर्माण करून हे सरकार कसे अडचणीत येईल, यावरच विरोधकांचा प्रयत्न दिसून येतो. त्यामुळे संवाद न करता केवळ शाब्दिक गँगवार सध्या विरोधकांकडून होत असल्याचा खोचक टोला त्यांनी भाजपचे नाव न घेता लगावला. मराठा आरक्षणावर ( Maratha Reservation ) बोलताना ते म्हणाले की, मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मागण्या असून त्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांबरोबर चर्चा करून त्यावर लवकर तोडगा काढण्याचे प्रयत्न महाविकास आघाडीकडून केले जात आहे.

साईंच्या दर्शनाला अशोक चव्हाण शिर्डीत - मी साईभक्त असून नेहमी साईंच्या दर्शनासाठी येत असतो आणि कोरोनाच्या काळखनंडात दोन वर्षे मंदिर बंद असल्याने दर्शनाला येऊ शकलो नाही. परंतु राज्यातील तसेच देशातील सर्वांना कोविडपासून मुक्तता मिळावी ही प्रार्थना मी साईंच्या चरणी करून आशीर्वाद घेयल्याचा आनंद झाला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करून राज्याला विकासाकडे नेऊन शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला कामाच्या माध्यमातून नक्कीच न्याय देण्याचा भूमिकेवर आमचा भर राहील, असेही ते म्हणाले. यावेळी अशोक चव्हाण यांचा साई संस्थांनच्यावतीने सत्कार करण्यात आला.

हेही वाचा- Raj Thackeray : राज ठाकरे पुण्याच्या दिशेने रवाना, विविध ठिकाणी जंगी स्वागत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.