साध्वी प्रज्ञासारख्या उमेदवारांना मतदारांनी धडा शिकवावा -अण्णा हजारे - साध्वी प्रज्ञा
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांबद्दलही अण्णांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अहमदनगर- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी प्रज्ञा सिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून नाराजी व्यक्त केली आहे. मतदारांच्या हातात मतदानाची चावी असते आणि या चावीचा उपयोग करून मतदारांनी अशा उमेदवारांना धडा शिकवला पाहिजे, असे परखड आवाहन अण्णांनी केले आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांबद्दलही अण्णांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोणतेही विकासाचे मुद्दे, शेतकरी, नागरिकांचे प्रश्न चर्चेत येत नसल्याने केवळ एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप उखाळ्या-पाखाळ्या काढण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. मतदारांनी हे विसरू नये की, त्यांच्या हातामध्ये मतदानाची चावी आहे. अशा गुंड, भ्रष्ट, बिचारी उमेदवारांना धडा शिकवण्याचे काम त्यांनी करावे असेही ते यावेळी म्हणाले.
सध्या पक्ष पैशांचे आमिष दाखवून मतदारांना बोलावतो. त्यामुळे मतदारांनी जागरूक राहिले पाहिजे. सध्या निवडणुकीत सत्तास्पर्धा असल्याने अनेक गुंड, भ्रष्ट व्यभिचारी लोकांना राजकीय पक्षांनी उमेदवारी देत केवळ निवडून येणे हा निकष लावला आहे. मात्र मतदारांनी चांगले उमेदवार शोधून त्यांना मतदान करण्याचे आवाहन अण्णा हजारे यांनी केले आहे.
Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
अहमदनगर- शहीद करकरें बद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रज्ञा सिंग सारख्या उमेदवारांना मतदारांनी धडा शिकवावा -अण्णा हजारे.
अहमदनगर- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी प्रज्ञा सिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्या बाबत केलेल्या आपत्तीजनक विधानावरून नाराजी व्यक्त केली आहे. मतदारांच्या हातात मतदानाची चावी असते आणि या चावीचा उपयोग करून अशा उमेदवारांना जनतेने धडा शिकवला पाहिजे असं मत अण्णांनी व्यक्त केले. सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांनी बद्दलही अण्णांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोणतेही विकासाचे मुद्दे, शेतकऱ्यांचे नागरिकांचे प्रश्न चर्चेत येत नसल्याने केवळ एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप उखाळ्या-पाखाळ्या काढण्याचे काम सुरू आहे त्यामुळे मतदारांनी हे विसरू नये की त्यांच्या हातामध्ये मतदानाची चावी आहे. अशा गुंड भ्रष्ट बिचारी उमेदवारांना धडा शिकवण्याचे काम मतदारांनी केलं पाहिजे असा आवाहन अण्णांनी केलं. सध्या पैशाचा पार्टीच आमिष दाखवून मतदारांना बोलावले जाते त्यामुळे मतदारांनी जागरूक राहिले पाहिजे सध्या निवडणुकीत सत्तास्पर्धा असल्याने अनेक गुंड, भ्रष्ट व्यभिचारी लोकांना राजकीय पक्षांनी उमेदवारी देत केवळ निवडून येणे हा निकष लावला आहे मात्र मतदारांनी चांगले उमेदवार शोधून त्यांना मतदान करावे असे यांना म्हणाले.
-राजेंद्र त्रिमुखे झ अहमदनगर.
Conclusion:अहमदनगर- शहीद करकरें बद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रज्ञा सिंग सारख्या उमेदवारांना मतदारांनी धडा शिकवावा -अण्णा हजारे.