ETV Bharat / state

इंदोरीकरांवर गुन्हा दाखल करा, अंनिसचे पीसीपीएनडिटी सल्लागार समितीकडे निवेदन

'सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा आणि विषम तिथीला झाला तर मुलगी होते,' असे वक्तव्य त्यांनी एका कीर्तनात केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर अंनिसच्या वतीने अहमदनगर इथे पीसीपीएनडीटी सल्लागार समितीकडे निवेदन देऊन तातडीने कारवाई करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

इंदोरीकरांवर गुन्हा दाखल करा, अंनिसची निवेदनाद्वारे मागणी

author img

By

Published : Feb 17, 2020, 8:27 PM IST

अहमदनगर - ह.भ.प इंदोरीकर महाराजांवर पीसीपीएनडिटी कायद्यासह महिलांची कीर्तनातून अवहेलना करत खिल्ली उडवली म्हणून आईपीसी कायद्यांव्ये गुन्हा दाखल करावा,अशी मागणी आज (सोमवार) अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने अहमदनगर येथे पीसीपीएनडिटी सल्लागार समितीकडे करण्यात आली. या मागणीचे निवेदन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव अ‌ॅड. रंजना गवांदे यांनी केली आहे.

इंदोरीकरांवर गुन्हा दाखल करा, अंनिसची निवेदनाद्वारे मागणी

इंदोरीकर महाराज यांनी त्यांच्या एका कीर्तनातून सम तारखेस स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो आणि विषम तारखेस स्त्रीसंग केल्यास मुलगी होते, असे वक्तव्य केले होते. त्यांनी समविषय तारखेचा संदर्भ देत मुलगा किंवा मुलगी याबाबत जाहिरात करून पीसीपीएनडिटी कायद्याचा भंग केला आहे. तसेच ते वारंवार आपल्या कीर्तनातून महिलांची अवहेलना करत असतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात तातडीने कारवाई करत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अंनिसने केली आहे.

हेही वाचा - समर्थकांनी मोर्चे-आंदोलने करू नयेत; मी कायदेशीर मार्गानेच लढणार - इंदूरीकर महाराज

इंदोरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्याला धार्मिक ग्रंथांचा आधार घेत दिला जात असलेला दाखला कायद्यापुढे न चालणारा आहे. एकीकडे स्त्री जन्मदर प्रचंड घसरला असल्याने देशात महाराष्ट्राने पीसीपीएनडीटी कायदा सर्वप्रथम केला आहे. मात्र, आता त्या कायद्याची पायमल्ली जर कोणी करत असेल तर त्या व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई करणे हे सामाजिक हितासाठी गरजेचे असल्याचे मत अ‌ॅड. गवांदे यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - 'कीर्तनातून 'निवृत्ती'? आता फेटा उतरवून करणार 'शेती'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.