ETV Bharat / state

Anil Parab In Shirdi : ईडीचे चौकशीसाठी समन्स; दुसरीकडे अनिल परब साईबाबा चरणी - अनिल परब यांनी ईडीचे समन्स

राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीने समन्स बजावले ( ED Summons Anil Parab ) आहे. मात्र, अनिल परब यांनी शिर्डीतील साई चरणी धाव घेतली ( Anil Parab In Shirdi ) आहे.

Anil Parab In Shirdi
Anil Parab In Shirdi
author img

By

Published : Jun 15, 2022, 4:14 PM IST

शिर्डी ( अहमदनगर ) - राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीने ( अंमबजावणी संचलनालय ) समन्स बजावले ( ED Summons Anil Parab ) आहे. मात्र, अनिल परब यांनी शिर्डीतील साई चरणी धाव घेतली ( Anil Parab In Shirdi ) आहे. मला काल ( मंगळवार ) नोटीस आली, परंतु मी मुंबईत नव्हतो. जेव्हा जेव्हा ईडी कडून मला बोलवलं जाईल, तेव्हा मी जाऊन त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देईल. पण, किरीट सौमैया कोण?, त्याच्या प्रश्नाची उत्तरे मी का देऊ, असा सवालही परब यांनी प्रसारमाध्यमांना केला आहे.

मे महिन्यात साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने 7 ठिकाणी छापेमारी केली होती. त्यादिवशी अनिल परब यांची 13 तास चौकशी करण्यात आली होती. ईडीला साई रिसॉर्टच्या प्रकरणात मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय आहे. त्यानंतर आता अनिल परब यांना ईडीने समन्स बजावलं आहे. मात्र, अनिल परब यांनी थेट साईबाबांच्या दरबारी धाव घेतली आहे. त्यांच्या दौऱ्याची शासकीय यंत्रणांना कोणतीही माहिती नव्हती. शिवसेनेचे मोजके पदाधिकारी त्यांच्या सोबत होते. तेव्हा त्यांनी साई मंदिरातील दुपारच्या आरतीला उपस्थिती लावली.

अनिल परब प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

ईडी कडून तुम्हाला वारंवार त्रास दिला जातोय का?, असा प्रश्न अनिल परब यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर ते म्हणाले की, हे तुम्हीच शोधा. मला जे प्रश्न विचारले जातात, त्याचं उत्तर मी त्या तपास यंत्रणांना देईल. आज ( बुधवार ) होऊ शकलो नाही. पण, मुंबईत गेल्यावर ईडी ऑफीसला जाईल, त्याबाबत त्यांना कळवल्याची माहिती त्यांनी दिली.

ईडीने नोटीस दिली असताना तुम्ही साईचरणी धाव घेतली. बाबांकडे काय मागीतलं यावर बोलताना परब यांनी म्हटलं की, मी नाशिकला बैठकीला आलो होतो. या भागात आले की साईंच्या दर्शनासाठी आवर्जून घेतो. आज दर्शन घेतले येथून एरक नवी उर्जा मिळते. साई चरणी मी महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे, अशी प्रार्थना केली. माझ्यावर जे आरोप करताय, त्यांनी करावेत. त्याची चौकशी व्हावी आणि जे सत्य बाहेर यावे, असेही परब यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा - Rahul Gandhi ED Enquiry : राहुल गांधींची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी, ईडी कार्यालयात दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.