अहमदनगर - गणेश उत्सव किंवा मुर्ती परंपरेतील उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा मुद्दा अवर्जून उपस्थित केला जातो. प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) व रासायनिक रंगांच्या वापरामुळे जल प्रदुषण होत असल्याने पर्यावरणपूरक गणपती तयार करण्याकडे कल वाढला आहे. इको-फ्रेंडली व शाडू, तुरटीच्या मूर्तींची मागणी वाढली आहे. अशा पर्यावरण पुरक तुरटीपासून निर्मित पांढऱया शुभ्र गणेशमुर्ती शिर्डीत विक्रीसाठी ग्रीन अन क्लीन शिर्डीच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
शिर्डीतील जुन्या पोस्ट ऑफिसच्या शेजारी तूरटीच्या गणपतीच्या मूर्तीचा स्टॉल लावण्यात आला असून प्रांताधिकारी गोविंद शिंदे, शिर्डीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या स्टॉलचे उदघाटन करण्यात आले आहे. पिओपीच्या मूर्तींना शाडूमाती, शेण व तुरटीपासून बनविलेल्या श्रीगणेश मूर्तीला योग्य व पर्यावरणपूरक पर्याय आहे. घरोघरी व मंडळांनी या मुर्तीची प्रतिष्ठापना करून यदाचा गणेशोत्सव प्रदूषण विरहित व पर्यावरपापूरक साजरा करावा यासाठी ग्रीन एन क्लीन शिर्डी टीमने घेतलेला पुढाकार गौरवास्पद असल्याचं प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी म्हटलं.
अगदी स्वस्त आणि उत्तम कारागीराने बनविलेल्या या मूर्ती सर्वसामान्य गणेश भाविकांना परवडतील याच दरात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. साधारणपणे 300 पासून ते 5 हजार रुपयांपर्यंत विविध उंचीत विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं ग्रीन अँड क्लीन फाउंडेशनचे अजित पारख यांनी सांगितलं. मार्बल सारख्याच रेखीव असणाऱ्या पांढऱ्या शुभ्र गणेश मूर्ती शिर्डीकरांना आकर्षित करतायं.
कुठल्याही प्रकारचा रंग नाही. अगदी पाण्याच्या टाकीत देखील विसर्जन होतील अशा या मूर्ती असून नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या वतीनं करण्यात आली आहे. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा करा, असे आवाहनही अजित पारख यांनी केले
हेही वाचा - कुमारिका-सुवासिनींसाठी श्रेष्ठ-पवित्र व्रत हरतालिका; वाचा कथा, महत्त्व, विधी