ETV Bharat / state

अण्णांचे 20 डिसेंबरपासून मौनव्रत; निर्भयाच्या गुन्हेगारांना त्वरित फाशीची केली होती मागणी - anna hajare opts for silent penance Ahemednagar latest news

निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशीस उशीर होत असल्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राळेगणसिद्धी येथे येत्या 20 डिसेंबर पासून मौनव्रत धारण करणार आहेत. आज (गुरूवारी) एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी जाहीर केले.

Senior Social worker anna hajare
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे
author img

By

Published : Dec 19, 2019, 6:42 PM IST

Updated : Dec 19, 2019, 8:31 PM IST

अहमदनगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राळेगणसिद्धी येथे येत्या 20 डिसेंबर पासून मौनव्रत धारण करणार आहेत. निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीस विलंब होत असल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी आज (गुरूवारी) एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले. गेल्या 9 डिसेंबरला अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 10 डिसेंबरला राष्ट्रपती कोविंद यांना याविषयी पत्र पाठवले होते. त्यांनी निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांच्या फाशीच्या शिक्षेची त्वरित अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी केली होती. अन्यथा आपण मौनव्रत धारण करू आणि पुढे जाऊन उपोषण आंदोलन करू, असा इशाराही दिला होता.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

'दिल्लीतील निर्भयाच्या आरोपींना फाशीची शिक्षा होऊन 7 वर्षे उलटली. मात्र, तरी अजूनही आरोपींना शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही. न्याय आणि शिक्षेला उशीर होत असल्यानेच हैदराबाद एन्काऊंटरचे जनतेने स्वागत केले आहे. न्याय मिळण्यास उशीर होत असताना याबाबत सरकारची उदासीनता चिंतित करणारी आहे. यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत,' असे त्यांनी प्रसिद्धपत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा - श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर धार्मिक विधी न करता शुक्रवारी होणार अंत्यसंस्कार

तसेच, दिल्लीतील निर्भया प्रकरण, पुण्यातील ज्योतिकुमार चौधरी बलात्कार प्रकरणातील फाशीची अंमलबजावणी न झाल्याने गुन्हेगारांची रद्द झालेली फाशी, हैदराबाद निर्भया प्रकरण आणि एन्काऊंटर आदी प्रकरणांचा दाखला देत न्यायाला आणि शिक्षेला होणारा उशीर नवीन गुन्ह्यांना प्रोत्साहित करणारा ठरत आहे. बलात्कार आणि हत्या प्रकरणात 2014 ला शेवटची फाशी झालेली आहे. त्यानंतर 426 प्रकरणात फाशीची शिक्षा होऊनही त्यांची अद्याप अंमलबजावणी नाही. फास्टट्रॅक कोर्टात सहा लाखाहून अधिक प्रकरणे आहेत. त्यातील अनेक प्रकरणे सहा-सात वर्षांपूर्वीची आहेत. निर्भया फंड महाराष्ट्रासह अनेक राज्यात उपयोगाविना पडून आहे. हेल्पलाईन नंबर 1091 काम करत नाही. 2012 पासून ज्यूडीशिअल अकाऊंटेबिलिटी बिल संसदेत पडून आहे, यावर अण्णांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Intro:अहमदनगर- निर्भया आरोपींना फाशीस उशीर आणि वाढते महिला अत्याचारावरावर चिंतीत अण्णा हजारे 20 डिसेंबर पासून राळेगणसिद्धी मौन धारण करणार..Body:राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_anna_diside_maun_image_7204297

अहमदनगर- निर्भया आरोपींना फाशीस उशीर आणि वाढते महिला अत्याचारावरावर चिंतीत अण्णा हजारे 20 डिसेंबर पासून राळेगणसिद्धी मौन धारण करणार..

अहमदनगर- अण्णांनी गेल्या 9 डिसेंबर पंतप्रधान मोदी आणि 10 डिसेंबरला राष्ट्रपती कोविंद यांना पत्र पाठवून निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांना त्वरित फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली होती, अन्यथा आपण मौनव्रत धारण करू आणि पुढे जाऊन उपोषण आंदोलन करू असा इशारा दिला होता. त्यामुळे अण्णांनी आज एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपण राळेगणसिद्धी या आपल्या गावी येत्या 20 डिसेंबर पासून मौनव्रत धारण करणार असल्याचे जाहीर केले आहे.
प्रसिद्धपत्रकात अण्णा म्हणतात की, दिल्लीतील निर्भयाच्या आरोपींना फाशीची शिक्षा होऊन सात वर्षे उलटली तरी अजून शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही, देशात फास्टट्रॅक कोर्टात लाखो प्रकरणे पडून आहेत, न्याय आणि शिक्षेला उशीर होत असल्यानेच हैदराबाद एन्काऊंटरचे जनतेने स्वागत केले आहे. न्याय मिळण्यास उशीर होत असताना याबाबत सरकारची उदासीनता चिंतीत करणारी आहे. यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत.
दिल्ली निर्भया प्रकरण, पुण्यातील ज्योतिकुमार चौधरी बलात्कार प्रकरणातील फाशीची अंमलबजावणी न झाल्याने गुन्हेगारांची रद्द झालेली फाशी, हैद्राबाद निर्भया प्रकरण आणि एन्काऊंटर आदी प्रकरणांचा दाखला देत न्यायाला आणि शिक्षेला होणारा उशीर नवीन गुन्ह्यांना प्रौत्साहित करणारा ठरत असल्याचे म्हंटले आहे. बलात्कार आणि हत्या प्रकरणात 2014 ला शेवटची फाशी झालेली आहे. त्यानंतर 426 प्रकरणात फाशीची शिक्षा होऊनही त्यांची अद्याप अंमलबजावणी नाही. फास्टट्रॅक कोर्टात सहा लाखाहून अधिक प्रकरणे आहेत, त्यातील अनेक प्रकरणे सहा-सात वर्षांपूर्वीची आहेत. निर्भया फंड महाराष्ट्रासह अनेक राज्यात उपयोगयाविना पडून आहे, हेल्पलाईन नंबर 1091 काम करत नाही, 2012 पासून ज्यूडीसीएल अकाऊंटबिलिटी बिल संसदेत पडून आहे. आदींवर अण्णांनी नाराजी व्यक्त केली आहे.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- निर्भया आरोपींना फाशीस उशीर आणि वाढते महिला अत्याचारावरावर चिंतीत अण्णा हजारे 20 डिसेंबर पासून राळेगणसिद्धी मौन धारण करणार..
Last Updated : Dec 19, 2019, 8:31 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.