ETV Bharat / state

अहमदनगर-पालिका रुग्णालय परिसरातच गांधी स्वच्छता अभियानाचे तीन तेरा

अहमदनगरच्या मुकुंदनगर उपनगरातील महानगरपालिकेच्या रुग्णालयाजवळ कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून यासाठी कचरापेटी उपलब्ध नाही, ना पालिकेची घंटा गाडी येथे कचरा उचलण्यास येते. महानगरपालिकेने या परिसरातील स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष केले असल्याचा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे.

स्वच्छता अभियान
author img

By

Published : Sep 5, 2019, 10:23 PM IST

अहमदनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 ला गांधी जयंतीनिमित्त भारत स्वच्छता अभियानाचा संकल्प हाती घेतला. हे अभियान देशव्यापी चळवळ व्हावी आणि 2 ऑक्टोबर 2019 ला महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीपर्यंत संपूर्ण देश स्वच्छ व्हावा ही अपेक्षा पंतप्रधान मोदींची आहे. मात्र, आता जयंतीला अवघा एक महिना बाकी असताना अनेक शहरांमध्ये स्वच्छतेची बोंब असून मुळात या अभियानाची थट्टा उडवण्यात आल्याचे दिसून येत आहे.

ahmednagar
महापालिका रुग्णालयाच्या सुरक्षाभिंतीजवळ पसरलेला कचरा

एकीकडे संपूर्ण देशात स्वच्छता अभियान राबविले जात असताना काही शहरात या अभियानाची थट्टा उडविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. अशीच काहीशी परिस्थिती अहमदनगरच्या मुकुंदनगर उपनगरातील महानगरपालिकेच्या रुग्णालयाजवळही दिसून येते. या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून यासाठी कचरापेटी उपलब्ध नाही, ना पालिकेची घंटा गाडी येथे कचरा उचलण्यास येते.

स्वच्छ भारत अभियान आणि शहरात पसरलेले कचऱ्याचे साम्राज्य

येथील स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की महानगरपालिकेने या परिसरातील स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष केलेले आहे. हे पालिकेचे रुग्णालय असूनसुद्धा या रुग्णालयाच्या सुरक्षा भिंतीजवळच नागरिक कचरा टाकत असून येथे घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने येथील आरोग्य व्यवस्थाच धोक्यात आली आहे. या प्रकरणी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांनी तसेच परिसरातील नागरिकांनी पालिकेच्या या अक्षम्य दुर्लक्षाबद्दल संताप व्यक्त केला आहे.

येथील कचरा साफ न केल्यास आम्ही आंदोलन करू, तसेच पालिकेने हा कचरा उचलण्यास दिरंगाई केली तर पालिका कार्यालयात हा कचरा आणून टाकू, मुकुंदनगर येथील रहिवाशांच्यावतीने पालिकेला असा इशारा देण्यात आला आहे.

Intro:अहमदनगर- पालिका दवाखाना परिसरातच गांधी स्वच्छता अभियानाचे तीन तेरा.. Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_dirt_public_reaction_pkg_7204297

अहमदनगर- पालिका दवाखाना परिसरातच गांधी स्वच्छता अभियानाचे तीन तेरा..

अहमदनगर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 अक्टोंबर 2014 ला गांधी जयंतीनिमित्त भारत स्वच्छता अभियानाचा संकल्प सोडला. हे अभियान देशव्यापी चळवळ व्हावी आणि 2 अक्टोंबर 2019 ला महात्मा गांधींच्या एकशे पन्नासाव्या जयंती पर्यंत संपूर्ण देश स्वच्छ व्हावा ही अपेक्षा पंतप्रधान मोदींची आहे.. मात्र आता जयंतीला अवघा एक महिना बाकी असला तरी अनेक शहरांमध्ये काय अवस्था आहे आणि मुळात या अभियानाची काय थट्टा उडाली आहे याचे हे बोलके प्रातिनिधिक चित्र मानावे लागेल..
अहमदनगरच्या मुकुंदनगर उपनगरातील महानगरपालिकेच्या दवाखान्या जवळ ही अशी परस्थिती आहे. ना या ठिकाणी कचरा कुंडी आहे ना पालिकेची घंटा गाडी येथील कचरा उचलण्यास येत आहे. येथील नागरिकांचा आरोप आहे की महानगरपालिकेने या परिसरातील स्वच्छते कडे साफ दुर्लक्ष केलेले आहे. पालिकेचा दवाखाना असताना दवाखान्याच्या सुरक्षा भीतीजवळच नागरिक कचरा टाकतात. यामुळे येथील आरोग्य व्यवस्थाच धोक्यात आली आहे. दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना, परिसरातील नागरिकांनी पालिकेच्या या अक्षम्य दुर्लक्षा बद्दल संताप व्यक्त केला आहे..
बाईट-

व्हीओ2- आता मुकुंदनगर रहिवाश्यांनी आंदोलनाचा इशारा दिला असून पालिकेने हा कचरा उचलण्यास दिरंगाई केली तर पालिका कार्यालयात हा कचरा आणून टाकू असा इशारा दिला आहे. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक संस्था, सेलिब्रेटी हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानात सहभागी होत नागरिकांचे प्रबोधन करत आहेत. मुळात स्वच्छ भारत ही जबाबदारी केवळ सरकार, शासकीय यंत्रणा यांचीच नसून नागरिकांनीही प्रत्येक्ष सहभाग त्यात घेत आपली जबाबदारी पार पाडावी अशी अपेक्षा आहे. त्याच बरोबर नागरी स्वच्छता राखण्याचे काम नगरपालिके सारख्या संस्थांनी प्राधान्यक्रमाने केले पाहिजे. अन्यथा केवळ अभियान घोषणेने काहीही साध्य होणार नसून अशा अभियानाचे हसूच होणार आहे..

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- पालिका दवाखाना परिसरातच गांधी स्वच्छता अभियानाचे तीन तेरा..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.