ETV Bharat / state

टी 20 मध्ये भारताचा पराभव: हार कर जीतेने वाले को ही बाजीगर कहते है- सोनू सूद - etv bharat maharashtra

कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊननंतर साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले झाले आहे. माध्यमांशी बोलताना अभिनेता सोनू सूद म्हणाला, की मी जेव्हा-जेव्हा शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतो. त्यानंतर एका नव्या उत्साहाने काम सुरू करतो.

अभिनेता सोनू सूद
अभिनेता सोनू सूद
author img

By

Published : Oct 26, 2021, 6:13 PM IST

Updated : Oct 26, 2021, 8:44 PM IST

अहमदनगर- अभिनेता सोनू सूदने आपल्या परिवारासोबत शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले आहे. टी 20 सामन्यात भारताचा पाकिस्तानचा पराभव झाल्याबाबत सोनूने 'हार कर जीत ने वालो को बाजीगर म्हणतो' असे म्हटले आहे. आर्यन खानही संकटातून बाहेर येईल, असा विश्वासही अभिनेता सोनू सूदने व्यक्त केला आहे.

कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊननंतर साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले झाले आहे. माध्यमांशी बोलताना अभिनेता सोनू सूद म्हणाला, की मी जेव्हा-जेव्हा शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतो. त्यानंतर एका नव्या उत्साहाने काम सुरू करतो.

साईबाबांचा आशीर्वाद नेहमी राहिला आहे

हेही वाचा-सोनू सूद आयकर विभागाच्या रडारवर; एफसीआरए कायद्याचे उल्लंघन केल्याची प्राथमिक माहिती

साईबाबांचा आशिर्वादबरोबर असल्याने सत्य बाहेर येईल
बॉलीवूड अभिनेता सोनू सूद म्हणाला की, माझ्यासह अनेकांना मधल्या काळात अडचणींचा सामना करावा लागला आहे. माझ्या कामाचे कौतुकही झाले व टिकाही झाली आहे. मात्र, काही फरक पडत नाही. ज्यांच्याबरोबर कोट्यवधी लोकांचा आणि साईबाबांचा आशिर्वाद असतो, ते अशा अडचणींना घाबरत नाहीत. संकटातून बाहेर पडतात. सध्या आर्यन खानही अडचणीत आला आहे. मात्र, साईबाबांचा आशिर्वादबरोबर असल्याने सत्य बाहेर येईल, असा विश्वास सोनू सूदने व्यक्त केला आहे. जे खरे आहे ते बाहेर येईल. सत्याबरोबर साईबाबांचा आशीर्वाद नेहमी राहिला आहे, असेही सोनूने म्हटले आहे.

अभिनेता सोनू सूद
अभिनेता सोनू सूद

हेही वाचा-आयकर विभागाच्या छाप्यावर सोनू सुदने ट्विटद्वारे दिली प्रतिक्रिया, म्हणाला....

हार कर जीतने वालो को बाजीगर कहते है-
भारत - पाकिस्तान टी 20 सामन्यामध्ये भारताचा पराभव झाला. या विषयावर विचारले असता सोनूने 'हार कर जीत ने वालो को बाजीगर कहते है' असे म्हटले आहे. साईच्या दर्शनासाठी आलेल्या सोनू सूदची एक झलक पाहण्यासाठी शिर्डीत त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. साई मंदिरातून बाहेर आल्यानंतर सोनूने गाडीच्या दरवाज्यात उभे राहून आपल्या चाहत्यांना सॅल्यूट केला. चाहत्यांनीही त्याला दाद दिली आहे.

सोनू सूदच्या घरावरही प्राप्तिकर विभागाने टाकले होते छापे

दरम्यान, प्राप्तिकर विभागाने अभिनेता सोनू सूदच्या घर आणि कार्यालयावर सप्टेंबरमध्ये छापे टाकले होते. त्याच्यावर कर चुकवल्याचे आरोप करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणावर अभिनेता सोनू सुद याने ट्विट करत प्रतिक्रिया दिली होती. प्रत्येक वेळी आपली बाजू मांडलीच पाहिजे, असे नाही. कधी कधी वेळही उत्तर देते, असे त्याने म्हटले होते.

हेही वाचा- आम आदमी पक्षात सामील होऊ शकतो सोनू सूद, पक्षाची बैठक केली

Last Updated : Oct 26, 2021, 8:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.