ETV Bharat / state

अहमदनगरमधील निघोज 'सैराट' प्रकरणातील फरार झालेला बाप पोलिसांच्या ताब्यात, प्रकरणाचे गूढ मात्र कायम - आरोपी

रुक्मिणी आणि तिच्या पतीला जाळण्यात आले, की पतीनेच रुक्मिणीला जाळून मारले याबाबत पोलीस तपास करत आहेत. त्याबाबत निघोज परिसरातील अनेक व्यक्तींकडून पोलीस माहिती घेत आहेत.

अहमदनगरमधील निघोज 'सैराट' प्रकरणातील फरार झालेला बाप पोलिसांच्या ताब्यात
author img

By

Published : May 8, 2019, 5:49 PM IST

Updated : May 8, 2019, 6:35 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील प्रेमविवाहातून झालेल्या जळीतकांडप्रकरणी मृत मुलगी रुक्मिणी हिच्या फरार आरोपी असलेल्या वडिलांना पोलिसांनी उत्तरप्रदेशमधून ताब्यात घेतले आहे. त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांच्यावर पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात मुलीचे चुलते सुरेन्द्र कुमार भरतीया, मामा घनश्याम सरोजा यांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे. आता वडिलांना अटक केल्यामुळे या प्रकरणातील अटक झालेल्यांची संख्या तीनवर पोहोचली आहे.

पोलीस अधिकारी

दरम्यान, नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक मनीष कलवानिया यांनी याबाबत माहिती देताना या प्रकरणाला अनेक कंगोरे असल्याचे सांगितले आहे. तसेच याबाबत तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली.

रुक्मिणी आणि तिच्या पतीला जाळण्यात आले, की पतीनेच रुक्मिणीला जाळून मारले याबाबत पोलीस तपास करत आहेत. त्याबाबत निघोज परिसरातील अनेक व्यक्तींकडून पोलीस माहिती घेत आहेत. यासंदर्भात अनेकांचे जबाब नोंद होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, एकूणच या प्रकरणाचे गूढ अजुनही कायमच आहे.

Intro:अहमदनगर- निघोज 'सैराट' प्रकरणातील फरार झालेला बाप रामा भरतिया हा पोलिसांच्या ताब्यात.. मात्र प्रकरणाचं गूढ कायम.. Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_8_may_ahm_trimukhe_1_dysp_kalvania_bite_b

अहमदनगर- निघोज 'सैराट' प्रकरणातील फरार झालेला बाप रामा भरतिया हा पोलिसांच्या ताब्यात.. मात्र प्रकरणाचं गूढ कायम..

अहमदनगर- जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील प्रेम विवाहातून झालेल्या जळीतकांड प्रकरणी मृत पावलेली मुलगी रुक्मिणी हिच्या फरार आरोपी असलेल्या वडिलांना पोलिसांनी उत्तरप्रदेशमधून ताब्यात घेतले आहे.त्याची तब्येत ठीक नसल्याने त्यांच्यावर पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात मुलीचे चुलते सुरेन्द्र कुमार भरतीया, मामा घनश्याम सरोजा यांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे. आता वडिलांना अटक केल्यामुळे या प्रकरणातील अटक झालेल्यांची संख्या तीनवर गेली आहे. दरम्यान नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक मनीष कलवानिया यांनी याबाबत माहिती देताना या प्रकरणाला अनेक कंगोरे असल्याचे सांगताना याबाबत तपास सुरू असल्याची माहिती माध्यमांना दिलेली आहे. रुक्मिणीचा छोटा भाऊ ययाने दिलेल्या नवीन माहितीमुळे या प्रकरणाचे गूढ अजून वाढली आहे. रुक्मिणील आणि तिच्या पतीला जाळण्यात आले की पतीनेच रुक्मिणी ला जाळून मारले याबाबत आता पोलिस तपास करत असून त्याबाबत निघोज परिसरातील अनेक व्यक्तींकडून पोलीस माहिती घेत आहेत. अनेकांचे जबाब नोंद होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र एकूणच या प्रकरणाचं गूढ वाढलं असल्याने संपूर्ण जिल्ह्यात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- निघोज 'सैराट' प्रकरणातील फरार झालेला बाप रामा भरतिया हा पोलिसांच्या ताब्यात.. मात्र प्रकरणाचं गूढ कायम..
Last Updated : May 8, 2019, 6:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.