शिर्डी (अहमदनगर) - गुरुवार आणि मकर संक्रातीच्या सुट्टी निम्मीत्त भाविकांनी शिर्डीत मोठी गर्दी केली आहे. भाविकांना तासन तास दर्शन पास घेण्यासाठी रहावे लागत आहे. यासाठी काही ठिकाणी काऊंटर सुरू करण्यात आले आहेत. मात्र, या पास काऊंटवर गर्दी झाल्याचे दिसुन येत आहे.
गुरुवार आणि मकर संक्रातीच्या सुट्टी निम्मीत्त भाविकांनी शिर्डीत मोठी गर्दी केली आहे. साई मंदीरात दर्शनाला जाण्यासाठी बायोमेट्रीक पासेस घ्यावे लागतात, त्यासाठी काही ठिकाणी काऊंटर सुरु केले आहेत. मात्र, साई संस्थानने तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या श्रीराम पार्कींग परीसरात मोठी गर्दी होत असते. या ठिकाणी केवळ चार पासेस काऊंटर सुरु आहेत. त्यात आज गर्दी वाढल्याने या काऊंटर पासेस घेण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे दिसुन आल आहे. या ठिकाणी भाविकांची दर्शन पास घेण्यासाठी मोठी गर्दी झाल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. पहाटे पासुन भाविकांनी पासेस साठी रांगा लावली आहे.
साई दर्शनासाठी पास घेण्यासाठी किमान चार ते पाच तास प्रतिक्षा करावी लागल्याची तक्रार भाविकांनी केली. पुर्वीही शिर्डीत गर्दी होत होती. मात्र, भक्तांना थेट दर्शन रांगेत सोडले जात होते, गेल्या काही वर्षा पासुन प्रतेक भक्तांला साई संस्थानने बायोमेट्रीक पास घेण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे भक्ताला काही तास आधी पास काढण्यासाठी थांबावे लागत आहे. नंतर पुन्हा दर्शन रांगेत उभे रहावे लागत असल्याने भक्तांची सुविधा होण्या एवजी त्रासच होत आहे. त्यामुळे भक्तांच्या सुविधेसाठी दर्शन पासेस वितरण काऊंटर वाढविण्याची साईभक्त आणि ग्रामस्थांनी मागणी केली आहे. मंदीरात साईभक्त गेल्या नंतर तीथे त्याच शांततेत दर्शन सध्या कोवीड नियमा मुळे होत आहे. दोन भक्ता मध्ये अंतर पाळल जात आहे. मात्र, मंदीर परीसराच्या बाहेर अंतर ठेवल जात नसल्याने करोणा नियमांचा फज्जा उडाल्याच दिसुन येत आहे.