ETV Bharat / state

जिल्ह्यात दिवसभरात आढळले २७ कोरोनाबाधित, तर २६ जणांची कोरोनावर मात

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. काल(बुधवारी) दिवसभरात 27 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली तर 26 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आत्तापर्यंत 728 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून यातील 20 जणांचा मृत्यू झाला आहे. 227 अ‌ॅक्टिव रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Government Hospital
जिल्हा शासकिय रुग्णालय
author img

By

Published : Jul 9, 2020, 12:03 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 27 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. काल २३३ कोरोना संशयितांचे नमुने तपासण्यात आले त्यात २०६ व्यक्तींचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले. नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये संगमनेर 11, पारनेर 4, अकोले 3, श्रीरामपूर 3, शेवगाव 5, अहमदनगर 1 समावेश आहे.

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार 1, पेमगिरी 1, पिंपळगाव कोंझिरा 3, खांडगाव 2, ढोलेवाडी 1, संगमनेर शहरातील रहेमतनगर येथे 1 तर विठ्ठलनगर येथे 2 रूग्ण आढळले. पारनेर तालुक्यातील सावरगाव 2, कर्जुले हर्या 1 आणि हंगा 1 गावात कोरोनाचे रूग्ण आढळले. अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा 1, काळेवाडी 1 आणि वीरगाव 1 येथे रूग्ण आढळले. श्रीरामपूर शहरात काझिबाबा रोड येथे 1 आणि वॉर्ड क्र. दोनमध्ये कोरोनाचे 2 रूग्ण आढळले. शेवगाव तालुक्यातील मुंगी 1 तर नींबे नांदूर येथे कोरोनाचे 4 रूग्ण आढळून आले. नगर शहरात मंगल गेट येथे एक कोरोनाबाधित आढळला. याशिवाय खासगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या 6 रुग्णांची नोंद एकूण रूग्ण संख्येत घेण्यात आली.

काल जिल्ह्यातील २६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. कोरोनामुक्त रुग्णांमध्ये नगर मनपा 14, कोपरगाव 3, पाथर्डी 2, राहाता 2, राहुरी 4 व श्रीरामपूरमधील एका रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात सध्या 227 रुग्णांवर उपचार सुरू असून आत्तापर्यंत 481 जणांनी कोरोनावर मात केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात आत्तापर्यंत 728 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून यातील 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, राज्यात बुधवारी 6 हजार 603 नव्या कोरोनाबाधीतांची नोंद झाली तर 198 जणांचा मृत्यू झाला आहे. बाधितांची एकूण संख्या 2 लाख 23 हजार 724 इतकी झाली आहे. राज्यातील 4 हजार 634 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 91 हजार 65 सक्रिय रूग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.