ETV Bharat / state

शेततळ्यातील २५ हजार माशांचा मृत्यू; श्रीरामपूरमध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल - 25 thousand fish killed shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापुर येथे निलेश पंडित कवडे आणि पंडित लक्ष्मण कवडे यांचे (गट नंबर ९१/अ मध्ये) एक एकर क्षेत्रात शेततळे आहे. त्यात त्यांनी मत्स्य पालन केले आहे. सहा महिन्यापूर्वी त्यांनी सोयापिनस कोंबडा जातीचे २५ हजार मासे या शेततळ्यात सोडले होते.

Dead fishes
मृत मासे
author img

By

Published : Jun 7, 2020, 4:44 PM IST

श्रीरामपूर (अहमदनगर) - तालुक्यातील भेर्डापुर येथील एका शेततळ्यात सुमारे 25 हजार माशांचा मृत्यू झाला आहे. अज्ञात इसमाने जाणून-बुजून विषारी पदार्थ टाकल्यामुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यामध्ये सुमारे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच शेततळ्यामधील अंदाजे सव्वा कोटी लीटर पाणी दूषित झाले आहे. याबाबत, श्रीरामपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

तालुक्यातील भेर्डापुर येथे निलेश पंडित कवडे आणि पंडित लक्ष्मण कवडे यांचे (गट नंबर ९१/अ मध्ये) एक एकर क्षेत्रात शेततळे आहे. त्यात त्यांनी मत्स्य पालन केले आहे. सहा महिन्यापूर्वी त्यांनी सोयापिनस कोंबडा जातीचे २५ हजार मासे या शेततळ्यात सोडले होते. त्याची आजमितीस पूर्ण वाढ झाली होती. मात्र, चार-पाच दिवसापूर्वी कवडे हे माशांना खाद्य टाकण्यासाठी शेततळ्यावर गेले असता मासे मृत होऊन गेलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आले.

मागील आठवड्यात झालेल्या चक्रीवादळाचा फायदा घेऊन अज्ञात इसमाने शेततळ्यात विषारी पदार्थ टाकून मासे मारल्याचा अंदाज, कवडे यांनी वर्तवला आहे. तसेच याबाबत नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

याबाबत, कृषी सहाय्यक बोरसे आणि तलाठी विकास शिंदे यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. दरम्यान, शेततळ्यात माशांचा मृत्यू झाल्यानंतर कवडे यांनी राहुरी मुळा डॅम येथील तज्ञांकडून आपल्या शेततळ्यातील पाण्याची तपासणी करून घेतली.

मात्र, शेततळ्यातील पाण्यात कुठलाही दोष नसल्याबाबत जालिंदर कवडे यांनी सांगितले आता यातील मृत मासे नाशिक येथील लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे कवडे यांनी सांगितले आहे. याप्रकरणी, श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.