पॅरिस - दोन वेळा पावसाच्या अडथळ्यानंतर अखेर फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत अग्रमानांकित सर्बियाच्या नोवाक जोकोविचचा चौथ्या मानांकित ऑस्ट्रियाच्या डोमॅनिक थीमने ६-२, ३-६, ७-५,५-७,५ -७ ने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता थीमचा सामना अंतिम फेरीत क्ले कोर्टचा बादशाह आणि ११ वेळचा फ्रेंच ओपन चॅम्पियन स्पेनच्या राफेल नदालशी होणार आहे. थीमने आतापर्यंत एकदाही ग्रँडस्लॅम किताब जिंकला नाही. त्याच्याकडे ही एक चांगली संधी आहे.
डोमॅनिक थीमने उपांत्य फेरीत जोकोविचवर सुरुवातीपासूनच दबाव टाकला होता. थीमने पहिल्या सेटमधील जोकोविचची सर्व्हिस भेदत ३-१ ने आघाडी घेतली. ही आघाडी डोमॅनिकने तशीच ठेवली. डोमॅनिकने आपला भन्नाट खेळ चालू ठेवला, त्याने पहिल्या सेटमध्ये पुन्हा एकदा जोकोविचची सर्व्हिस ब्रेक करत पहिला सेट ६-२ अशा फरकाने जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये जोकोविचने आपल्या अनुभवाचा फायदा घेत डोमॅनिक थीमवर दबाव टाकला. दुसऱ्या सेटमध्ये जोकोविचने थीमची सर्व्हिस ब्रेक करत सेटमध्ये २-० अशी आघाडी घेतली. जोकोविचने आपली तुफान खेळी चालूच ठेवत दुसऱ्या सेटमध्ये थीमला पुनरागमनाची संधीच दिली नाही. अखेर जोकोविचने दुसरा सेट ६-३ ने जिंकला. तिसरा सेटमध्ये डोमॅनिकने पुन्हा जोरदार वापसी करत सेट ५-७ ने जिंकला.
डोमॅनिकची सर्व्हिस भेदण्यात जोकोविचला खुप संघर्ष करावा लागत होता. डोमॅनिकने अखेरच्या क्षणी जोकोविचची सर्व्हिस ब्रेक करत तिसरा सेट ५-७ ने आपल्या नावे केला. आणि सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली. चौथ्या सेटमध्ये जोकोविच थीमची सर्व्हिस ब्रेक करत सेटमध्ये आघाडी घेतली. मात्र थीमने सामन्यात पुनरागमन करत जोकोविचची सर्व्हिस ब्रेक करत सेट ५-५ ने बरोबरीत आणले. मात्र जोकोविचने पुन्हा एकदा थीमची सर्व्हिस ब्रेक करत चौथा सेट ५-७ ने जिंकून स्कोर २-२ करत सामन्यात पुन्हा एका रंगत आणली.
पाचवा आणि निर्यायक सेटमध्ये दोघांमध्ये जबरदस्त खेळ पहायला मिळाला. दुसऱ्या सेटमध्ये जोकोविचला थीमची सर्व्हिस भेदण्याची संधी होती मात्र थीमने चांगला खेळ करत सर्व्हिस राखली. जोकोविचची दुसरी सर्व्हिस भेदत पाचव्या सेटमध्ये ३-१ अशी आघाडी घेतली. अखेर पाचवा सेट ५-७ ने जिंकत सामना ६-२,३-६, ७-५,५-७, ५ -७ ने आपल्या नावे केला. त्याचा अंतिम फेरीत नदालशी सामना होणार आहे.
नदालने आतापर्यंत रेकॉर्ड ११ वेळा फ्रेंच ओपनची स्पर्धा जिंकला आहे. आता त्याची नजर १२ व्या किताबावर आहे. फेडरर दहा वर्षानंतर फ्रेंच ओपन जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. फेडरर २००९ मध्ये स्वीडनच्या रॉबीन सोडरलिंगला नमवून एकमेव फ्रेंच ओपन किताब जिंकला होता. मात्र त्यावेळी नदालने या स्पर्धेतून माघार घेतली होती.
नदाल आणि फेडरर यांच्यात आतापर्यंत ३९ सामने झाले आहेत. यामध्ये २४ वेळा नदाल तर केवळ १५ वेळा फेडरर जिंकला आहे. फ्रेंच ओपनमध्ये नदालने फेडररला सहा वेळा नमविले आहे. नदाल आतापर्यंत एकूण १७ ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकला आहे. यामध्ये ११ फ्रेंच ओपन, एक ऑस्ट्रेलियन ओपन, दोन विम्बल्डन, आणि ३ यूएस ओपन स्पर्धा जिंकला आहे. फ्रेंच ओपनमध्ये नदालने एकूण ९४ सामने जिंकले असून, केवळ दोनच सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये ७४ सामने तो ३-० ने जिंकला आहे. यावरूनच त्याचा फ्रेंच ओपनमधील दबदबा दिसून येतो.