ETV Bharat / sports

सिमोना हालेपची माद्रीद ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक - WTA

हालेपने यापूर्वी 2016 आणि 2017 मध्ये माद्रीद ओपनचा किताब आपल्या नावावर केला आहे

सिमोना हालेपची माद्रीद ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक
author img

By

Published : May 8, 2019, 9:26 PM IST

स्पेन (माद्रीद) - डब्ल्यूटीएच्या (Women's Tennis Association) जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या रोमानियाच्या सिमोना हालेपने माद्रीद ओपन स्पर्धेत महिला एकेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. दोन वेळा माद्रीद ओपनचा किताब आपल्या नावावर केलेल्या सिमोनाने स्लोव्हाकियाचे विक्टोरिया कुजमोवाला 6-0, 6-0 ने नमवत अंतिम 8 मध्ये जागा मिळवली आहे.

माद्रीद ओपनच्या तिसऱ्या विजेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या सिमोनाचा क्वार्टर फायनलमध्ये सामना ऑस्ट्रेलियाच्या अॅशली बार्टीशी होणार आहे. हालेपने यापूर्वी 2016 आणि 2017 मध्ये माद्रीद ओपनचा किताब आपल्या नावावर केला आहे.

नाओमी ओसाका
नाओमी ओसाका

सिमोनासोबत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली जपानची महिला टेनिस खेळाडू नाओमी ओसाकानेही माद्रिद ओपनमध्ये महिला एकेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.