नवी दिल्ली - भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने १० जून २०१९ मध्ये क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. यानंतरच्या काळात तो सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतो. त्याने काही दिवसांपूर्वीच दिनेश कार्तिकला सौरव गांगुलीचा किस्स्यावरून ट्रोल केले होते. आता आशाच एका वेगळ्या कारणासाठी तो चर्चेत आला आहे.
युवराज सिंह हा खोडकर स्वभावाचा खेळाडू म्हणून प्रचलित आहे. तो नेहमी आपल्या सोशल मीडियाच्या अकांऊटवरुन चाहत्यांसाठी मजेशीर पोस्ट करत असतो. आता त्याने आपल्या इन्स्टाग्रामवरून नव्या लूकचा फोटो शेअर केला होता. काही दिवसांपूर्वी दाढी असलेला फोटो पोस्ट केल्यानंतर आता वेगळाच फोटो शेअर केला आहे.
हेही वाचा - धोनी धावबाद झाला, त्यावेळी रडायचा बाकी होतो - युजवेंद्र चहल
युवीच्या या फोटोवर भारताची महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने कमेंट केली आहे. युवराजच्या क्लीन शेव केलेला फोटोवर सानिया मिर्झाने, वाढलेले गाल लपवण्यासाठी पाउट केला आहे का? दाढीवाल्या लूकमध्येच परत ये, अशी कमेंट केली आहे.
नेमकं युवीच्या फोटोत आहे काय ?
युवीने आपलाच क्लीन शेव असलेला फोटो शेअर केला आहे. यात त्याने चष्मा घातला असून पाउट करताना दिसत आहे. युवीने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले की, 'न्यू लूक, चिकना चमेला, मी पुन्हा दाढी ठेवायला पाहिजे का? असा प्रश्नही त्याने विचारला आहे.
![Sania Mirza comment on Yuvraj Singh new 'chikna chamela' look](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4591671_gg.jpg)
यावर सानियाने आपली प्रतिक्रिया नोंदवत दाडीवाल्या लूकमध्ये परत ये, असा सल्ला दिला आहे. दरम्यान, युवराजच्या या नव्या लूकवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. जुना युवराज परत आला असेही काही चाहत्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - ५२ चेंडूत नाबाद १०६ ठोकत नेपाळच्या खेळाडूने रचला टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास