ETV Bharat / sports

Australian Open : संघर्षपूर्ण लढतीत राफेल नदालचा पराभव - ऑस्ट्रेलिया ओपन २०२०

जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला स्पेनचा खेळाडू राफेल नदालचे ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेतील आव्हान संपूष्टात आले. तब्बल चार तास चाललेल्या लढतीत नदालचा डॉमिनिक थिआम याने पराभव केला.

Rafael Nadal crashes out of Australian Open after thriller with Dominic Thiem
Australian Open : संघर्षपूर्ण लढतीत राफेल नदालचा पराभव
author img

By

Published : Jan 29, 2020, 7:16 PM IST

Updated : Jan 29, 2020, 8:12 PM IST

मेलबर्न - जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला स्पेनचा खेळाडू, राफेल नदालचे ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेतील आव्हान संपूष्टात आले. तब्बल चार तास चाललेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत ऑस्ट्रेयाच्या डॉमिनिक थिआम याने नदालचा ७-६ (७/३), ७-६ (७/४), ४-६, ७-६ (८/६) असा पराभव केला.

Rafael Nadal crashes out of Australian Open after thriller with Dominic Thiem
डॉमिनिक थिआम

नदाल-थिआम यांच्यातील लढत ४ तास १० मिनिटे चालली. यात पहिलाच सेट टायब्रेकरमध्ये गेला. या टायब्रेकरमध्ये थिआमने बाजी मारली आणि नदालला पहिला धक्का बसला. नदाल पहिला सेट ६-७ ने गमावला. दुसऱ्या सेटमध्ये नदाल पुनरागमन करत असेल, असे वाटत होते. पण हा सेट पुन्हा एकदा टायब्रेकरमध्ये गेला. दोघांचीही ६-६ अशी बरोबरी झाली होती. पण त्यानंतर थिआमने पुन्हा एकदा टायब्रेकर जिंकत सामन्यात २-० अशी आघाडी मिळवली.

राफेल नदाल आणि डॉमिनिक थिआम यांच्यातील लढतीचा निकाल

तिसऱ्या सेटमध्ये नदालने शानदार पुनरागमन केले. त्याने हा सेट ६-४ ने जिंकला आणि आपले आव्हान जिवंत ठेवले. चौथा सेटही चांगलाच गाजला. कारण या सेटमध्येही दोघांची ६-६ अशी बरोबरी झाली आणि सामना टायब्रेकरमध्ये गेला. या टायब्रेकरमध्ये पुन्हा एकदा थिआमने बाजी मारली. त्याने टायब्रेकर ८-६ असा जिंकला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला.

हेही वाचा - ऑस्ट्रेलियन ओपन : रोमानियन टेनिसपटू सिमोना हॅलेप उपांत्य फेरीत

हेही वाचा - Australian Open : हरलेली बाजी कशी जिंकायची.. हे फेडररने दाखवलं, ५ सेट्सच्या थरारात गाठली उपांत्य फेरी

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jan 29, 2020, 8:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.