माद्रिद - जागतिक क्रमवारीत दुसऱ्यास्थानी असलेली जपानची स्टार खेळाडू नाओमी ओसाकाला माद्रिद ओपनमध्ये पराभवाचा धक्का बसला. दुसऱ्या फेरीत ओसाकाचा चेक गणराज्यच्या कॅरोलिना मुचोवा हिने पराभव केला.
कॅरोलिना मुचोवाने या हंगामात याआधी क्रमवारीत टॉप-५ मध्ये सहभागी असलेल्या तीन खेळाडूंचा पराभव केला आहे. तिने माद्रिद ओपनच्या दुसऱ्या फेरीत एक तास ४९ मिनिटे रंगलेल्या सामन्यात नाओमीचा ६-४, ३-६, ६-१ धुव्वा उडवला.
हेही वाचा - नदालने १२व्यांदा जिंकली बार्सिलोना ओपन स्पर्धा
हेही वाचा - टेनिस प्रीमियर लीगमध्ये यूकी भांबरी करणार दिल्लीचे नेतृत्व