मेलबर्न - इवॉन डेडिंग आणि फिलीप पोलासेक या जोडीने गतविजेत्या जो सॅलिसबरी आणि राजीव राम या जोडीचा पराभव करत ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या पुरूष दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
नवव्या मानांकित जोडी पाचव्या मानांकित जोडीवर वरचढ ठरली. अंतिम सामना डोडिंग आणि पोलासेक जोडीने ६-३, ६-४ अशा फरकाने जिंकत पहिल्या विजेतेपदाला गवसणी घातली.
-
Raw emotion 😤
— #AusOpen (@AustralianOpen) February 21, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The moment @DodigTennis and Filip Polasek became #AO2021 men's doubles champions 🏆#AusOpen pic.twitter.com/6ePpqqmaJb
">Raw emotion 😤
— #AusOpen (@AustralianOpen) February 21, 2021
The moment @DodigTennis and Filip Polasek became #AO2021 men's doubles champions 🏆#AusOpen pic.twitter.com/6ePpqqmaJbRaw emotion 😤
— #AusOpen (@AustralianOpen) February 21, 2021
The moment @DodigTennis and Filip Polasek became #AO2021 men's doubles champions 🏆#AusOpen pic.twitter.com/6ePpqqmaJb
विजयानंतर डोडिंगने सांगितले की, अविश्वरणीय आठवण. 'हे आमचे संघ म्हणून पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. या सामन्यात आम्ही भरपूर आनंद घेतला. आशा आहे की, पुढे देखील ही कामगिरी कायम राहिल.'
दरम्यान, २००९ ते २०११ या काळात बॉब आणि माइक ब्रायन या जोडीने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे सलग विजेतेपद पटकावले होते. यंदाच्या वर्षी डोडिंग आणि पोलासेक जोडीने आपले पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकले आहे.
हेही वाचा - ऑस्ट्रेलियन ओपन : विजेतेपदासाठी मेदवेदेव-जोकोव्हिच आमनेसामने
हेही वाचा - ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आज 'महामुकाबला'