मेलबर्न - जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या डिएगो श्वार्ट्जमॅन याने फ्रेंचमॅन अलेक्झांडर मुलर याचा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. श्वार्ट्जमॅनने मुलरचा १ तास ३२ मिनिटे रंगलेल्या सामन्यात ६-२, ६-०, ६-३ अशा फरकाने पराभूत केले.
श्वार्ट्जमॅन याने सलग चौथ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची तिसरी फेरी गाठली आहे. त्याने मुलर याची ९ वेळा सर्विस मोडीत काढली.
श्वार्ट्जमॅन याचा पुढील फेरीत रुसच्या असलान करत्सेव याच्याशी होणार आहे. करत्सेव याने दुसऱ्या फेरीत बेलारुसचा खेळाडू इगोर गेरासिमोव याचा ६-०, ६-१, ६-० ने पराभव करत तिसरी फेरी गाठली आहे.
दुसरीकडे यूएस ओपन विजेता डॅमिनिक थीमने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची तिसरी फेरी गाठली आहे. दुसऱ्या फेरीत त्याने जर्मनच्या डॉमिनिक कोएफर याचा एकतर्फा पराभव केला. थीमने डॉमिनिक यांच्याविरुद्धचा सामना १ तास ३९ मिनिटात ६-४, ६-०, ६-२ अशा फरकाने जिंकला.
हेही वाचा - ऑस्ट्रेलियन ओपन : गतविजेत्या सोफिया केनिनची दुसऱ्या फेरीत धडक
हेही वाचा - ऑस्ट्रेलियन ओपन : रोहन बोपण्णा आणि बेन मॅकलॅचलनचा पराभव