ETV Bharat / sports

अॅलेक्झँडरचे 'पानिपत' करत मेदवेदेव्हने जिंकली 'शांघाय मास्टर्स स्पर्धा'

अंतिम सामना मेदवेदेव्हने अवघ्या १ तास १३ मिनिटात जिंकला. पहिल्या सेट ६-४ ने पराभूत झाल्यानंतर अॅलेक्झँडर दुसऱ्या सेटमध्ये आघाडी घेईल, अशी अपेक्षा होती. मात्र, मेदवेदेव्हच्या झंझावतीसमोर अॅलेक्झँडरचा निभाव लागला नाही आणि दुसरा सेट ६-१ ने जिंकत मेदवेदेव्हने चषकावर नाव कोरले.

अॅलेक्झँडरचे 'पानिपत' करत मेदवेदेव्हने जिंकली शांघाय मास्टर्स स्पर्धा
author img

By

Published : Oct 13, 2019, 5:08 PM IST

शांघाय (चीन) - रशियाच्या अव्वल टेनिसपटू डेनिल मेदवेदेव्हने शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रतिस्पर्धी अॅलेक्झँडर झ्वेरेव्हचा पराभव करत स्पर्धा जिंकली. मेदवेदेव्हने अंतिम सामन्यात अॅलेक्झँडरला संधी दिली नाही. त्याने हा सामना एकतर्फी ६-४, ६-१ अशा फरकाने जिंकला.

अंतिम सामना मेदवेदेव्हने अवघ्या १ तास १३ मिनिटात जिंकला. पहिल्या सेट ६-४ ने पराभूत झाल्यानंतर अॅलेक्झँडर दुसऱ्या सेटमध्ये आघाडी घेईल, अशी अपेक्षा होती. मात्र, मेदवेदेव्हच्या झंझावतीसमोर अॅलेक्झँडरचा निभाव लागला नाही आणि दुसरा सेट ६-१ ने जिंकत मेदवेदेव्हने चषकावर नाव कोरले.

शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेची तब्बल ६ वेळा अंतिम फेरी गाठणाऱ्या मेदवेदेव्हचे हे कारकिर्दीतील चौथे विजेतेपद आहे. महत्वाचे म्हणजे, हिल्यादांच मेदवेदेव्हने अॅलेक्झँडरचा पराभव केला आहे. दरम्यान, यूएस ओपन स्पर्धेतील मेदवेदेव्हच्या पराभवानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेदवेदेव्हची स्तुती केली होती. त्यांनी मेदवेदेव्हकडून खूप काही शिकण्यासारखे असल्याचे म्हटले होते.

हेही वाचा - फेडररने चाहत्यांच्या विनंतीवर बदलला प्रोफाइल फोटो; तुम्हीही म्हणाल क्या बात!

हेही वाचा - सेमीफायनलमध्ये हरला, तरीही गाठले कारकिर्दीतले सर्वोच्च स्थान

Intro:Body:

sports marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.