मेलबर्न - जवळपास एका वर्षानंतर ग्रँडस्लॅम स्पर्धेत वापसी करणारी महिला टेनिसपटू अॅश्ले बार्टी हिने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची दुसरी फेरी गाठली आहे. जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या बार्टीने पहिल्या फेरीत डंका कोविनिच हिचा ६-०, ६-० असा धुव्वा उडवला.
मागील वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत बार्टीला पराभवाचे तोंड पाहावे लागले. सोफिया केनिन हिने बार्टीचा पराभव केला होता. त्यानंतर अंतिम सामना जिंकत केनिन हिने ग्रँडस्लॅम देखील जिंकले. बार्टी कोरोनाच्या धोक्यामुळे यूएस ओपन स्पर्धेत सहभागी झालेली नव्हती.
बार्टीने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या फेरीत कोविनिच हिचा ४४ मिनिटात एकतर्फा पराभव करत दुसरी फेरी गाठली. बार्टीने कोविनिचला एक पाँईंट देखील जिंकू दिला नाही.
हेही वाचा - ऑस्ट्रेलियन ओपन : गतविजेत्या सोफिया केनिनची दुसऱ्या फेरीत धडक
हेही वाचा - Australian Open : नदाल, मेदवेदेवची विजयी सलामी; अगुतला पराभवाचा धक्का