ETV Bharat / sports

अमेरिकेच्या सोफियाला ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद - ऑस्ट्रेलिया ओपन २०२० स्पर्धेची विजेती सोफिया केनिन

२१ वर्षीय सोफियाने अंतिम सामन्यात दोन ग्रँडस्लॅम विजेती गार्बिन मुगुरुजाला ४-६, ६-२, ६-२ अशी धूळ चारली. सोफियाने २ तास २ मिनिटे रंगलेल्या सामन्यात बाजी मारत कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम पटकावले.

Australian Open 2020 : Sofia Kenin beats Garbine Muguruza to win Australian Open final
अमेरिकेच्या सोफियाला ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद
author img

By

Published : Feb 1, 2020, 4:37 PM IST

Updated : Feb 1, 2020, 5:52 PM IST

मेलबर्न - अमेरिकेची महिला टेनिसपटू सोफिया केनिनने ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. २१ वर्षीय सोफियाने अंतिम सामन्यात दोन ग्रँडस्लॅम विजेती गार्बिन मुगुरुजाला ४-६, ६-२, ६-२ अशी धूळ चारली. सोफियाने २ तास २ मिनिटे रंगलेल्या सामन्यात बाजी मारत कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम पटकावले.

पहिल्या सेटमध्ये सोफिया-मुगुरुजामध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. सोफियाने ४-४ अशी बरोबरी साधल्यानंतर मुगुरुजाने आघाडी घेतली आणि सेट जिंकला. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये सोफियाने मुगुरुजाला संधीच दिली नाही. एकवेळ सोफियाने ४-१ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर मुगुरुजाने पुढचा गेम जिंकला पण सोफियाने सलग दोन गेम जिंकत सामन्यात १-१ अशी बरोबरी केली.

तिसरा सेट रंगतदार होईल अशी आपेक्षा वर्तवण्यात येत होती. पण क्रमवारीत १४ व्या स्थानी असलेल्या सोफियाने निर्णायक सेट ६-२ ने जिंकत सामन्यासह विजेतेपदाला गवसणी घातली.

Sofia Kenin beats Garbine Muguruza to win Australian Open final
सोफिया-मुगुरुजा सामन्याचा निकाल...

ऑस्ट्रेलिया ओपन जिंकल्यानंतर सोफियाच्या क्रमवारीत सुधारणा झाली असून तिने १४ व्या स्थानावरुन ७ व्या स्थानावर उडी घेतली आहे. सोफियाने वयाच्या ५ व्या वर्षी ग्रँडस्लॅम जिंकण्याचे ध्येय उरी बाळगले होते.

Intro:Body:

marathi sports news

Conclusion:
Last Updated : Feb 1, 2020, 5:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.