मुंबई - इंग्लंडचा स्टार टेनिसपटू अँडी मरेने ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील विलगीकरण पूर्ण होणे कठीण असल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अँड मरेने ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेत तब्बल पाच वेळा अंतिम फेरीत गाठली होती.
तीन ग्रँडस्लॅम विजेता अँडी मरेची एक आठवड्याआधी मेलबर्नला जाण्यासाठी कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात तो पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे त्याने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत अँडी मरे म्हणाला की, 'विलगीकरणाच्या प्रक्रियेतून योग्य मार्ग काढण्यासाठी माझी टेनिस ऑस्ट्रेलियाशी सातत्याने बोलणी सुरू होती. परंतु मी अपयशी ठरलो. माझ्या आवडत्या स्पर्धेत खेळू न शकल्याची खंत मला वाटत आहे.'
अँडी मरेला ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेत वाइल्ड कार्डद्वारे एन्ट्री मिळाली होती. मरे सध्या जागतिक टेनिस क्रमवारीत १२३ व्या स्थानावर आहे. तीन ग्रँडस्लॅम विजेत्या मरेने आतापर्यंत पाच वेळा (२०१०, २०११, २०१३, २०१५ आणि २०१६) ऑस्ट्रेलियन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेला ८ फेब्रुवारीपासून मेलबर्न पार्कवर सुरूवात होत आहे. या स्पर्धेसाठी कोणताही खेळाडू, प्रशिक्षक किंवा अधिकाऱ्यांना ऑस्ट्रेलियात पोहोचल्यावर १४ दिवसांचे विलगीकरण बंधनकारक आहे.
हेही वाचा - ऑस्ट्रेलियन ओपनपूर्वी अँडी मरे कोरोना पॉझिटिव्ह
हेही वाचा - ऑस्ट्रेलिया ओपन : दोन खेळाडूंना कोरोनाची लागण