ETV Bharat / sports

वर्ल्ड चॅम्पियन ख्रिस्टियन कोलमन टोकियो ऑलिम्पिकमधून बाहेर! - ख्रिस्टियन कोलमन बंदी न्यूज

कोलमनला मेमध्ये तात्पुरते निलंबित करण्यात आले होते. २०१९मध्ये तो तीनदा नमुना गोळा करणार्‍या अधिकाऱयांसमोर हजर होऊ शकला नाही. जर एखाद्या खेळाडूने १२ महिन्यांच्या आत तीनदा तथाकथित मुक्कामाच्या नियमांचे उल्लंघन केले तर त्याला दोन वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागते.

world champion christian coleman to miss tokyo olympics after two year ban
वर्ल्ड चॅम्पियन ख्रिस्टियन कोलमन टोकियो ऑलिम्पिकमधून बाहेर!
author img

By

Published : Oct 28, 2020, 6:57 PM IST

मोनाको - पुरुष गटात डोपिंग नियंत्रणासंदर्भात तीन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल १०० मीटर वर्ल्ड चॅम्पियन ख्रिस्टियन कोलमनवर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. ट्रॅक अँड फील्डच्या अ‍ॅथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटने म्हटले आहे, की मे २०२२पर्यंत कोलमनवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कोलमन पुढच्या वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकणार नाही.

world champion christian coleman to miss tokyo olympics after two year ban
ख्रिस्टियन कोलमन

२४ वर्षीय अमेरिकन धावपटू कोलमनला मेमध्ये तात्पुरते निलंबित करण्यात आले होते. २०१९मध्ये तो तीनदा नमुना गोळा करणार्‍या अधिकाऱयांसमोर हजर होऊ शकला नाही. जर एखाद्या खेळाडूने १२ महिन्यांच्या आत तीनदा तथाकथित मुक्कामाच्या नियमांचे उल्लंघन केले तर त्याला दोन वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागते. कोलमन क्रीडा लवादामध्ये याविरोधात अपील करू शकतो.

कोलमन ऑलिम्पिक सुवर्ण पदकाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. त्याने दोहा, कतारमध्ये १०० मीटरमध्ये आणि ४X१०० मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले. गेल्या वर्षी १०० मीटर शर्यतीत कोलमनने चॅम्पियन धावपटू उसेन बोल्टचा पराभव केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.