ETV Bharat / sports

World Championship Final : उद्या 'महामुकाबाला', नीरज चोप्रा आणि रोहित यादव यांच्याकडून पदकाची आशा - sports news

आता सर्वांच्या आशा जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022 ( World Athletics Championships 2022 ) मधील गोल्डन बॉय नीरज चोप्राकडून आहेत. नीरजसाठी सध्याचा सीझन आतापर्यंत चांगला गेला आहे. त्याने अंतिम फेरीत मजबूत स्थान निर्माण केले आहे. नीरजसोबत रोहित यादवही रविवारी (24 जुलै) होणाऱ्या अंतिम फेरीत पदकासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसणार आहे.

Neeraj Chopra
नीरज चोप्रा
author img

By

Published : Jul 23, 2022, 4:00 PM IST

हैदराबाद: भारताची अनुभवी महिला भालाफेक ऍथलीट अनु राणी ( Female javelin athlete Anu Rani ) 2022 च्या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकण्यापासून वंचित राहिली. महिलांच्या भालाफेकच्या अंतिम फेरीत अनुला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. तिने दुसऱ्या प्रयत्नात 61.12 मीटर भाला फेकला केली, पण ते पदक जिंकण्यासाठी पुरेशी नव्हती. भारताला आता गोल्डन बॉय नीरज चोप्राकडून पदकाच आशा ( Neeraj Chopra hopes for a medal ) आहेत. नीरज रविवारी (24 जुलै) अंतिम फेरीत आपले नशीब आजमावणार आहे. नीरजशिवाय रोहित यादवही 12 खेळाडूंच्या अंतिम फेरीत आपली प्रतिभा दाखवताना दिसणार आहे.

अनु राणीने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिपची फायनल गाठली होती. तिने अंतिम फेरीत पहिला थ्रो 56.18 मीटर केला, तर दुसरा थ्रो 61.12 मीटर होता जी दिवसातील सर्वोत्तम थ्रो होता. तिसऱ्या थ्रोमध्ये अनुचा भाला 59.27 मीटर अंतरावर पडला, तर चौथा थ्रो 58.14 मीटर होता. पाचव्या थ्रोमध्ये अनुने 59.98 मीटर भालाा फेकली, तर सहाव्या थ्रोमध्ये 58.70 मीटर भाला फेकला.

नीरज चोप्राला ( Golden boy Neeraj Chopra ) अ गटात स्थान देण्यात आले असून या वर्षीच्या स्पर्धेत अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. चोप्राने पहिल्यांदाच 88.39 मीटर फेक केली. अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी त्याला किमान 83.50 मीटर भाला फेकणे आवश्यक होते, जे त्याने पार केले. आता तो अंतिम फेरीत पदकासाठी आणखी एका खेळाडूशी स्पर्धा करताना दिसणार आहे.

चोप्रा भारतीय वेळेनुसार सकाळी 7.05 वाजता अंतिम फेरीत उतरेल आणि संपूर्ण देशाला त्याच्याकडून भारतासाठी सुवर्णपदक मिळवून देण्याची अपेक्षा असेल. नीरज चोप्राने ( Javelin thrower Neeraj Chopra ) जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी त्याने आणखी एका स्पर्धेत भाग घेतला होता, मात्र त्यानंतर तो अंतिम फेरीत जाऊ शकला नाही. यानंतर कोपराच्या दुखापतीमुळे तो शेवटच्या स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही.

नीरज चोप्रानंतर भारताचा रोहित यादवही अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. रोहित यादवला केवळ 77.32 मीटर फेक करता आले असले तरी बाकीच्या खेळाडूंनी त्याहूनही कमी फेक केल्याने त्याने अव्वल 12 मध्ये प्रवेश केला. रोहित यादवचा ( Javelin thrower Rohit Yadav ) 11वा क्रमांक आला आहे. नीरज चोप्रा अ गटात, तर रोहित यादवला ब गटात ठेवण्यात आले. आता रविवारी भारताचे दोनच खेळाडू पदक जिंकण्यासाठी मैदानात उतरतील.

हेही वाचा - CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्समधील भारताविषयक मनोरंजक तथ्थे, घ्या जाणून

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.