मुंबई : महिला क्रिकेट खेळाडूंच्या पहिल्या WPL 2023 लिलावासाठी, सर्व 5 संघांसाठी 87 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ज्यामध्ये 30 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. यादरम्यान स्मृती मंधाना हिला सर्वाधिक ३.४ कोटी रुपयांना विकत घेतले गेले, तर अॅश्ले गार्डनर ३.२ कोटी रुपयांना विकली जाणारी सर्वात महागडी परदेशी खेळाडू ठरली. यादरम्यान, विशेष बाब म्हणजे अमेरिकेची तारा नॉरिस ही असोसिएट देशांमधून एकमेव खेळाडू म्हणून निवडली गेली.
लिलावामध्ये खेळाडूंसाठी लागली मोठी चुरस : राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूने महिला आयपीएल 2023 च्या लिलावात क्रिकेट स्टार स्मृती मंधानासाठी सर्वात मोठी बोली लावत खरेदी केले. तिच्यासाठी मुंबई इंडियन्स आणि राॅयल चॅलेंजर्स यांच्यात मोठी चुरल लागली. परंतु, मुंबई इंडियन्सच्या प्रयत्नांना यश आले नाही. सर्वात महागडी बोली लावत राॅयल चॅलेंजर्सने तिला खरेदी केले. लिलावाच्या दिवशी 19 खेळाडूंना संभाव्य म्हणून निवडण्यात आले होते. यूएईच्या माहिका गौरसाठी स्वारस्य दाखवण्यात आले होते. परंतु, परदेशी खेळाडूंचा स्लॉट संपल्यामुळे तिला खरेदी करता आले नाही.
बंगळुरू आणि चेन्नई ही सर्वाधिक बोली लावणारी शहरे : आजच्या महिला आयपीएलमध्ये बंगळुरू आणि चेन्नई ही दोन शहरे सर्वाधिक बोली लावणारी ठरली. यामध्ये राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूने सर्वाधिक बोली लावत स्मृतीला स्थान दिले. त्याच श्रेणीतील तिसऱ्या क्रमांकासाठी तुमचा अंदाज आणखी एक मोठी भारतीय मेट्रो असेल तर तुम्ही चुकीचे आहात. इंदूर हे मध्य भारतीय शहर होते जे 11 बोलींसह पुढे आले. दोन अंकी बोली असलेली ती फक्त तीन शहरे होती, त्यानंतर कोलकाता नऊसह होते. मुंबईत सर्वात कमी चार बोली लागल्या होत्या.
महिला आयपीएलमधील महत्त्वाच्या खेळाडूंविषयी :
टॉप 3 सर्वात महागडे भारतीय खेळाडू : स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स
3 सर्वात महागडे परदेशी खेळाडू विकले गेले : अॅशले गार्डनर, नेट सायव्हर-ब्रंट, बेथ मूनी
महिला आयपीएलमधील पांच संघातील खेळाडूंची यादी :
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : स्मृती मानधना, सोफी डिव्हाईन, एलिस पेरी, रेणुका सिंग, ऋचा घोष, एरिन बर्न्स, दिशा कासट, इंद्राणी रॉय, श्रेयंका पाटील, कनिका आहुजा, आशा शोभना, हिदर नाइट, डेन व्हॅन निकर्क, प्रीती बोस, पूनम खेम, पूनम कोमल जंजाड, मेगन शुट, सहाना पवार.
मुंबई इंडियन्स : हरमनप्रीत कौर, नॅट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, हीदर ग्रॅहम, इस्सी वोंग, अमनजोत कौर, धारा गुजर, शैका इशाक, हेली मॅथ्यूज, क्लो ट्रायॉन, हुमैरा काझी, प्रियांका बालाव जिंतामणी कलिता, नीलम बिष्ट.
गुजरात जायंट्स : अॅशले गार्डनर, बेथ मुनी, सोफिया डंकले, अॅनाबेल सदरलँड, हरलीन देओल, डायंड्रा डॉटिन, स्नेह राणा, एस मेघना, जॉर्जिया वेरेहम, मानसी जोशी, डी हेमलता, तनुजा कंवर, मोनिका पटेल, सुषमा वर्मा, हर्ले गाला, अश्विनी कुमारी, पारुनिका सिसोदिया, शबनम एमडी.
यूपी वॉरियर्स : सोफी एक्लेस्टोन, दीप्ती शर्मा, ताहलिया मॅकग्रा, शबनम इस्माईल, अलिसा हिली, अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड, पार्श्वी चोप्रा, श्वेता सेहरावत, एस यशश्री, किरण नवगिरे, ग्रेस हॅरिस, देविका वैद्य, लॉरेन शेख, लॉरेन शेख, लॉरेन शेख.
दिल्ली कॅपिटल्स : जेमिमाह रॉड्रिग्स, मेग लॅनिंग, शेफाली वर्मा, राधा यादव, शिखा पांडे, मारिजाने कॅप, तितास साधू, एलिस कॅप्सी, तारा नॉरिस, लॉरा हॅरिस, जसिया अख्तर, मिन्नू मणी, तान्या भाटिया, जेस जोनासेन, स्नेहा या दीप्ती, पूनम , अरुंधती रेड्डी, अपर्णा मंडल.
हेही वाचा : WPL Auction 2023 RCB : आरसीबीने 'या' खेळाडूंवर खर्च केले करोडो रुपये; जाणून घ्या कोणा-कोणाचा आहे समावेश