लंडन: नोव्हाक जोकोविचने आठव्यांदा विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली आहे. सर्बियाच्या दिग्गज टेनिसपटूने उपांत्य फेरीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत 9व्या क्रमांकाचा खेळाडू कॅम नोरीचा 2-6, 6-3, 6-2, 6-4 असा पराभव ( Novak Djokovic defeated Cameron Nori ) केला. पहिला सेट गमावलेल्या जोकोविचने त्यानंतरचे तीन सेट जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले, जिथे त्याचा सामना ऑस्ट्रेलियन खेळाडू निक किर्गिओसशी ( Australian player Nick Kyrgios ) होईल.
-
Djokovic. Kyrgios.
— Wimbledon (@Wimbledon) July 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Centre Court. Sunday.#Wimbledon | #CentreCourt100 pic.twitter.com/GUldzbDgmR
">Djokovic. Kyrgios.
— Wimbledon (@Wimbledon) July 8, 2022
Centre Court. Sunday.#Wimbledon | #CentreCourt100 pic.twitter.com/GUldzbDgmRDjokovic. Kyrgios.
— Wimbledon (@Wimbledon) July 8, 2022
Centre Court. Sunday.#Wimbledon | #CentreCourt100 pic.twitter.com/GUldzbDgmR
राफेल नदालने गुरुवारी पोटदुखीमुळे ( Nadal withdrew due to abdominal pain ) विम्बल्डनच्या उपांत्य फेरीतून माघार घेतली आणि त्याचा अंतिम चार मधील प्रतिस्पर्धी निक किर्गिओसला अंतिम फेरीत ढकलले. नवव्या मानांकित कॅमेरॉन नोरीने शानदार सुरुवात करत पहिला सेट 6-2 असा सहज जिंकला. मात्र त्यानंतर त्याला गती राखता आली नाही आणि पुढील तीन सेट गमावून सामना गमावला. दोन्ही खेळाडूंमधील हा उपांत्य फेरीचा सामना दोन तास 34 मिनिटे चालला.
जोकोविचने फेडररचा विक्रम मोडला : जोकोविचची ही 20वी विम्बल्डन फायनल असेल. यासह या खेळाडूने विक्रमी 32व्यांदा ग्रँडस्लॅम फायनल गाठली ( Djokovic reached GrandSlam final 32nd time ) असून रॉजर फेडररचा 31वेळा पोहोचण्याचा विक्रम मोडला आहे. पुरुष एकेरीत सर्वाधिक वेळा अंतिम फेरी गाठण्याच्या बाबतीत तो अव्वल स्थानी पोहोचला आहे.
-
Most Grand Slam men’s singles final appearances:
— Wimbledon (@Wimbledon) July 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
32 - @DjokerNole
31 - Roger Federer
30 - Rafael Nadal
19 - Ivan Lendl
18 - Pete Sampras#Wimbledon | #CentreCourt100 pic.twitter.com/EPd8EB4Tmk
">Most Grand Slam men’s singles final appearances:
— Wimbledon (@Wimbledon) July 8, 2022
32 - @DjokerNole
31 - Roger Federer
30 - Rafael Nadal
19 - Ivan Lendl
18 - Pete Sampras#Wimbledon | #CentreCourt100 pic.twitter.com/EPd8EB4TmkMost Grand Slam men’s singles final appearances:
— Wimbledon (@Wimbledon) July 8, 2022
32 - @DjokerNole
31 - Roger Federer
30 - Rafael Nadal
19 - Ivan Lendl
18 - Pete Sampras#Wimbledon | #CentreCourt100 pic.twitter.com/EPd8EB4Tmk
जोकोविच सातव्यांदा विजेतेपद पटकावणार : जोकोविचने गेल्या वर्षी सलग तिसऱ्यांदा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले होते. एकूण सहा वेळा त्याने ही स्पर्धा जिंकली आहे. 2018, 2019 आणि 2021 मध्ये विजेतेपद मिळवण्याबरोबरच त्याने 2011, 2014 आणि 2015 मध्येही विजेतेपद पटकावले होते. फेडरर (8), पीट सॅम्प्रास (7) आणि विल्यम रेनशॉ (7) यांनी जोकोविचपेक्षा जास्त विम्बल्डन जेतेपदे जिंकली आहेत. जोकोविचला सॅम्प्रास आणि रेनशॉ यांची बरोबरी करण्याची संधी असेल.
विम्बल्डनमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत जोकोविच दुसऱ्या स्थानावर पोहोचला: विम्बल्डनमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत जोकोविचने जिमी कॉनर्सला (84) मागे टाकले आहे. आता तो या बाबतीत फक्त रॉजर फेडररच्या (105) मागे आहे. जोकोविचचा विम्बल्डनमधील हा 85 वा विजय आहे. नोरी आणि जोकोविच यांच्यातील हा दुसरा सामना होता आणि दोन्ही वेळा जोकोविच जिंकला आहे.
हेही वाचा - Kapil Dev Statement : अश्विन कसोटीतून बाहेर होऊ शकतो, तर कोहलीलाही टी 20 संघातून वगळले जाऊ शकते कपिल देव