मुंबई - टोकियो ऑलिम्पिकचा सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राने बुधवारी एक मुलाखत दिली. यात त्याने ऑलिम्पिक फायनलमध्ये त्याच्या पहिल्या थ्रो आधी घडलेली घटना सांगितली. तो म्हणाला की, पाकिस्तानचा अॅथलिट अर्शद नदीमने माझा भाला घेतला होता. यामुळे मी आपला पहिला थ्रो गडबडीत केला.
नीरज चोप्राच्या मुलाखतीनंतर सोशल मीडियावर पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम याला ट्रोल करण्यात येत आहे. यात त्याला काही लोकांनी शिवीगाळ केली आहे तर काहींनी त्याच्यावर भाल्यामध्ये छेडछाड करत असल्याचा आरोप लावला आहे. दरम्यान, त्या मुलाखतीमध्ये नीरज चोप्राने असे काही म्हटलं नव्हतं. त्याने उलट अर्शद खानचे कौतुक करत पाकिस्तानी जनतेने त्याला साथ द्यावी, असे आवाहन नीरजने केले होते. तरी देखील सोशल मीडियावर ट्रोलर्सने चूकीचा मुद्दा पुढे रेटत अर्शद धारेवर धरलं आहे.
नीरज चोप्राने आता या विषयावर व्हिडिओ शेयर करत स्पष्टीकरण केलं आहे. नीरजने गुरूवारी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात तो म्हणतो, 'सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे की, पाकिस्तान भालाफेकपटू अर्शद नदीमने माझा भाला घेतला. हा मुद्दा मोठा बनवला जात आहे. ही सामान्य बाब आहे.'
सर्व भालाफेकपटू आपला भाला एकत्र ठेवतात आणि त्याचा वापर कोणीही करू शकतो. हा नियम आहे. पण काही लोक याला मोठा मुद्दा करत आहेत. सर्वांना माझी विनंती आहे की, असे करू नका. खेळाने आपल्याला सगळ्यांना एकत्र चालण्यास शिकवलं आहे. आम्ही सर्व भालफेकपटू मिळून राहतो, अशा शब्दात नीरजने आवाहन केले आहे.
-
मेरी आप सभी से विनती है की मेरे comments को अपने गंदे एजेंडा को आगे बढ़ाने का माध्यम न बनाए। Sports हम सबको एकजूट होकर साथ रहना सिखाता हैं और कमेंट करने से पहले खेल के रूल्स जानना जरूरी होता है 🙏🏽 pic.twitter.com/RLv96FZTd2
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) August 26, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">मेरी आप सभी से विनती है की मेरे comments को अपने गंदे एजेंडा को आगे बढ़ाने का माध्यम न बनाए। Sports हम सबको एकजूट होकर साथ रहना सिखाता हैं और कमेंट करने से पहले खेल के रूल्स जानना जरूरी होता है 🙏🏽 pic.twitter.com/RLv96FZTd2
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) August 26, 2021मेरी आप सभी से विनती है की मेरे comments को अपने गंदे एजेंडा को आगे बढ़ाने का माध्यम न बनाए। Sports हम सबको एकजूट होकर साथ रहना सिखाता हैं और कमेंट करने से पहले खेल के रूल्स जानना जरूरी होता है 🙏🏽 pic.twitter.com/RLv96FZTd2
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) August 26, 2021
दरम्यान, पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम नीरज चोप्राला आपला आदर्श मानतो. विशेष म्हणजे नीरजकडे पाहून त्याने भालाफेकपटू होण्याचा निर्णय घेतला. आशियाई स्पर्धेतील नीरज आणि अर्शद यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या स्पर्धेत नीरजने सुवर्ण तर अर्शदने कास्य पदक जिंकले होते.
हेही वाचा - टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या रेल्वेच्या महिला हॉकीपटूंचा मध्य रेल्वेकडून सत्कार
हेही वाचा - Tokyo Paralympics: टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेल नॉकआउट फेरीत, भारताला पदकाची आशा