मुंबई - प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामात आज (शनिवार) यू मुंबाच्या घरच्या सामन्यांना सुरुवात झाली. यू मुंबाने पुणेरी पलटनचे कडवे आव्हान मोडीत काढताना ३३-२३ अशा १० गुणांच्या फरकाने विजय मिळवला.
-
A promising second half led us to an unbeatable win with a solid lead of 1⃣0⃣ points. All thanks to your love and support Mumbai!!!#UMumba #MeMumba #Mumboys #VivoProKabaddi #HowsTheJosh #MUMvPUN #MaharashtraDerby pic.twitter.com/XSvjeHp2fs
— U Mumba (@U_Mumba) July 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A promising second half led us to an unbeatable win with a solid lead of 1⃣0⃣ points. All thanks to your love and support Mumbai!!!#UMumba #MeMumba #Mumboys #VivoProKabaddi #HowsTheJosh #MUMvPUN #MaharashtraDerby pic.twitter.com/XSvjeHp2fs
— U Mumba (@U_Mumba) July 27, 2019A promising second half led us to an unbeatable win with a solid lead of 1⃣0⃣ points. All thanks to your love and support Mumbai!!!#UMumba #MeMumba #Mumboys #VivoProKabaddi #HowsTheJosh #MUMvPUN #MaharashtraDerby pic.twitter.com/XSvjeHp2fs
— U Mumba (@U_Mumba) July 27, 2019
पहिल्या सत्रात दोन्ही संघाकडून बरोबरीचा खेळ झाला. दोन्ही संघाच्या बचावपटूंनी सावध खेळ करताना चढाईपटूंना जास्त गुणांची कमाई करु दिली नाही. दुसऱ्या सत्रात मुंबाच्या बचावपटूंनी आक्रमक खेळ करताना पुणेरी पलटनच्या चढाईपटूंवर दबाव वाढवला. दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच मिनिटाला मुंबाने पलटनवर लोन चढवत ५ गुणांची आघाडी घेतली. मुंबाने आघाडी कायम ठेवताना ३१ व्या मिनिटाला पुणेरी पलटनवर दुसरा लोन चढवत १० गुणांची आघाडी घेतली. मुंबाने शेवटपर्यंत ही आघाडी कायम ठेवताना सामना ३३-२३ गुणफरकाने आरामात जिंकला.
मुंबाकडून चढाईत अर्जून देस्वाल आणि अभिषेक सिंहने प्रत्येकी ५-५ तर, रोहित बालियानने ४ गुणांची कमाई केली. तर, बचावात कर्णधार फजल अत्राचली, सुरेंदर सिंग आणि फजल अत्राचलीने प्रत्येकी ४-४ गुणांची कमाई करताना पुणेरीच्या चढाईपटूंना निष्प्रभ केले. पुणेरी पलटनकडून कर्णधार सुरजितने भक्कम बचाव करताना ६ गुणांची कमाई केली. परंतु, तो संघाचा पराभव टाळू शकला नाही. गिरीश एर्नाक आज सपशेल अपयशी ठरल्याने आणि चढाईपटूंना निराशा केल्यामुळे पुणेरी पलटनला महाराष्ट्रयीन डर्बीत पराभवाला सामोरे जावे लागले.