ETV Bharat / sports

टेबल टेनिसपटू शरथ कमलशी 'ईटीव्ही भारत'ची बातचित - शरथ कमल मुलाखत

भारताचा स्टार टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमलशी ईटीव्ही भारतने बातचित केली.

tokyo-olympics-interview-i-had-him-completely-cornered-sharath-on-his-defeat-to-ma-long
टेबल टेनिसपटू शरथ कमलशी 'ईटीव्ही भारत'ची बातचित
author img

By

Published : Jul 29, 2021, 4:58 PM IST

मुंबई - भारताचा स्टार टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमलचे टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान तिसऱ्या फेरीत संपुष्टात आले. मिश्र दुहेरीत शरथ कमल मनिका बत्रासोबत खेळत होता. परंतु तिथे देखील भारतीय जोडीला पदक जिंकण्यात अपयश आले. याविषयावर ईटीव्ही भारतने शरथ कमलशी बातचित केली. यात शरथ कमलने विविध विषयावर भाष्य केलं.

तू गतविजेता लोंगचा पराभव करण्यासाठी सक्षम होतास का, सामन्याबाबत तुझी काय मानसिकता होती, असा प्रश्न शरथ कमलाला विचारला असता शरथ यावर म्हणाला, 'स्पर्धा सुरू होण्याआधी मला माहिती होत की, माझ्यासाठी हा ड्रॉ खूप कठीण आहे. दुसऱ्या फेरीत अपोलोनिया, ज्याला मी मागील 15 वर्षांत कधीही पराभूत करू शकलो नव्हतो. तरी देखील मी सकारात्मक विचार करत त्याच्या सामोरे गेले. यामुळे पुढे कोणता खेळाडू आहे हे महत्वाचं ठरत नाही. मी फक्त सामना जिंकण्याचा विचार करतो.'

मी हाच निर्धार मनाशी बाळगत लोंगविरुद्ध मैदानात उतरलो. सामन्यात मी तिसरा सेट जिंकलो. कदाचित मी सामना जिंकू शकलो असतो तर हा सामना वेगळाच असता. दुर्दैवीरित्या मी जिंकू शकलो नाही. लोंगवर मी दबाव निर्माण केला होता. परंतू तो यातून सावरला. मी माझ्या कामगिरीवर खूश आहे. मी लोंगविरुद्दच्या सामन्यात चांगले शॉट खेळलो. यासाठी मी खूप मेहनत घेतली. मी माझा सर्वश्रेष्ठ दिलं असल्याचे देखील शरथ म्हणाला.

मिश्र दुहेरी बद्दल शरथ कमलला विचारले असता शरथ म्हणाला की, मिश्र दुहेरीमध्ये आम्हाला पदकाची आशा होती. पदक नाही तर आम्ही कमीत कमी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहचण्याच्या प्रयत्नात होते. मी म्हणेन की, मिश्र दुहेरी आणि एकेरीचा ड्रॉ बाबत आम्ही कमनशिबी ठरलो. जर दुसरी जोडी असती तर आम्हाला कमीत कमी आपला खेळ खेळण्याची संधी तरी मिळाली असती. आमचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. कारण चीनी ताईपे जोडी यून-जू यांनी पूर्णपणे आमच्यावर वर्चस्व मिळवलं.

पुढील ऑलिम्पिक खेळण्याबाबत तू काय निर्णय घेतला आहेस का असे विचारले असता, शरथ कमल म्हणाला, मी हा पर्याय खुला ठेवला आहे. मी या बाबतचा निर्णय आत्ताच घेऊ शकत नाही. मी राष्ट्रकूल स्पर्धा आणि आशियाई स्पर्धेत खेळण्यासाठी तयारी करत आहे. जे एका वर्षांनंतर होणार आहे. मी त्या स्पर्धतून पुढे जाईन.

Tokyo Olympics : गोलरक्षक आणि बचावफळी भेदत वरुण कुमारचा अप्रतिम गोल; पाहा व्हिडिओ

Tokyo Olympics : चीनने ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेचे वर्चस्व संपवलं; विश्वविक्रम नोंदवत जिंकलं सुवर्णपदक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.