ETV Bharat / sports

Tokyo Olympic : रवी दहियाला सुवर्ण पदक जिंकण्याची संधी; जगज्जेत्याशी आज होणार लढत - टोकियो ऑलिम्पिक 2020

कुस्तीपटू रवी कुमार दहिया याने बुधवारी भारताचे टोकियो ऑलिम्पिकमधील आणखी पदक निश्चित केलं आहे. त्याने कुस्तीमध्ये 57 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या सनायेव नूरीस्लामचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात रवी कुमार दहियाचा सामना 2 वेळचा जगज्जेता रशियाचा झवुर युगुऐव याच्याशी होणार आहे.

tokyo olympic 2020 : ravi-dahiya-vs-zaur-uguev-tokyo-olympics-wrestling-final-match-updates
Tokyo Olympic : रवी दहियाला सुवर्ण पदक जिंकण्याची संधी; 2 वेळचा जगज्जेत्याशी आज होणार लढत
author img

By

Published : Aug 5, 2021, 1:20 PM IST

Updated : Aug 5, 2021, 2:46 PM IST

टोकियो - भारतीय कुस्तीपटू रवी कुमार दहिया याने बुधवारी भारताचे टोकियो ऑलिम्पिकमधील आणखी पदक निश्चित केलं आहे. त्याने कुस्तीमध्ये 57 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या सनायेव नूरीस्लामचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात रवी कुमार दहियाचा सामना 2 वेळचा जगज्जेता रशियाचा झवुर युगुऐव याच्याशी होणार आहे. जर रवी कुमार दहियाने युयुऐवचा अंतिम सामन्यात पराभव केला तर तो कुस्तीमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणारा पहिला कुस्तीपटू ठरेल.

रवी दहिया आणि झवुर युगुऐव दोघेही फॉर्मात -

रवी दहिया आणि झवुर युगुऐव हे दोघेही चांगल्या फॉर्मात आहेत. दोघे याआधी 2019 विश्व चॅम्पियनशीपमध्ये समोरासमोर आले होते. तेव्हा रशियाच्या कुस्तीपटूने हा सामना 6-4 असा जिंकला होता. विश्व चॅम्पियनशीपमध्ये रवी कुमारला कास्य पदकावर समाधान मानावे लागले होते. रवीने 2020 आणि 2021 आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं आहे. याशिवाय त्याने 2018 मध्ये अंडर 23 चॅम्पियनशीपमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती.

रवी दहिया- झवुर युगुऐव आज आमने-सामने

रवी कुमार दहिया आणि युगुऐव आज पुन्हा आमने-सामने येणार आहेत. रवी कुमारला विश्व चॅम्पियनशीपमधील पराभवाचा बदला घेण्याची नामी संधी आहे. तो आज रशियाच्या कुस्तीपटूला आस्मान दाखवत सुवर्ण पदक जिंकू शकतो.

कुस्तीमध्ये भारताने आतापर्यंत 5 पदकं जिंकली

सुशील कुमारने भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सलग दोन वेळा पदक जिंकलं. सुशीलने 2008 बिजिंग ऑलिम्पिकमध्ये कास्य तर 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलं होतं. सुशील शिवाय योगेश्वर दत्तने 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकलं होतं. तर 2015 रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकने कास्य पदक जिंकले होते. खाशाबा जाधव भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे पहिले कुस्तीपटू होते. त्यांनी 1952 मध्ये हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये हा कारनामा केला होता.

हेही वाचा - टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणाऱ्या भारतीय हॉकी संघातील खेळाडूविषयी जाणून घ्या...

हेही वाचा - Tokyo Olympics : पुरूष हॉकी संघाने 41 वर्षांनंतर जिंकलं पदक, जर्मनीला नमवत 'कांस्य'वर केला कब्जा

Last Updated : Aug 5, 2021, 2:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.