नवी दिल्ली - यंदाच्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) भारतीय संघाची घोषणा केली आहे. कतारमधील दोहा येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी २५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेतून उंच उडी स्पर्धेतील भारताचा खेळाडू तेजस्वनी शंकर याने माघार घेतली आहे.
हेही वाचा - दीपिका, अनुष्कामध्ये हॉट कोण.. या प्रश्नावर जसप्रीत बुमराहने दिले 'हे' उत्तर
भारतीय अॅथलेटिक्स महासंघाला (एएफआय) शंकरने याबाबत माहिती दिली. एएफआयने त्यानंतर एक पत्रक काढून शंकर या स्पर्धेत खेळणार नसल्याचे जाहीर केले. 'अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या तेजस्वनी शंकरने आम्हाला सांगितले आहे की, तो सध्या त्याच्या लयीत नाही. कामगिरी व्यवस्थित होत नसल्याने यंदाच्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत तो खेळू शकणार नाही', असे एएफआयने म्हटले आहे.
एएफआयचे अध्यक्ष आदिले जे. सुमारीवाला म्हणाले, 'आमची इच्छा होती की शंकरने या स्पर्धेत भाग घ्यावा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचा अनुभव प्राप्त करावा. पण, त्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. आम्हाला आशा आहे की, तो चांगला सराव करेल आणि टोकियो येथील ऑलिम्पिक स्पर्धेत तो भारतीय संघाचा हिस्सा होईल.
संघ -
पुरुष : जाबिर एमपी, जिंसन जॉनसन, अविनाश सेबल, के टी इरफान आणि देवेंद्र सिंह, टी. गोपी, एम. श्रीशंकर, तजिंदर पाल सिंह तूर, शिवपाल सिंह, मोहम्मद अनास, निर्मल नाओ टॉम, एलेक्स एंटनी, अमोज जैकब, केएस जीवन, धारुन अय्यास्वामी आणि हर्ष कुमार
महिला : पी यू चित्रा, अन्नू रानी, हिमा दास, विस्मया वीके, पूवम्मा एमआर, जिस्ना मैथ्यू, रेवती वी, सुभावनकत्सन, विथ्या आर.