मुंबई - कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे सर्व व्यवहार, कामे ठप्प आहेत. अशात गरीब रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरांवर उपासमारीची वेळ आली आहे. असा गरजूंसाठी सर्व स्तरातून मदतीचा ओघ येत आहे. भारताची सेलिंग खेळाडू (नौकायन) श्वेता शेरवगार ही गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
श्वेता, त्याचे मित्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांसह (एनएसएस) गरजू लोकांसाठी मदत करत आहे. याविषयी तिने सांगितलं की, 'आम्हाला गरजूंची यादी मिळाली. यात रबाळे, घनसोळी, कोपरखैरणे, तुर्भे, नेरूळ, (नवी मुंबईचा सर्व परिसर), मानखुर्द, गोवंडी या परिसरातील मजूरांचा समावेश आहे. या लोकांना आम्ही आमच्या परीने मदत दिली आहे.'
दरम्यान, श्वेता होमिओपॅथी डॉक्टर असून ती सद्या नवी मुंबईतील येरळा मेडिकल कॉलेजमध्ये इंटर्नशिप करत आहे. तिने २०१८ साली इंडोनेशियामध्ये झालेल्या अशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. श्वेताच्या आधी अनेक खेळाडूंनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
हेही वाचा - अमेरिका क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी भारतीय खेळाडूची निवड
हेही वाचा - भारताने आकारलेले शुल्क न भरल्याने, यजमानपद गमावले; झाला 'इतका' दंड