टोकियो - सर्बियाच्या नौकायन टीममधील एक खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सर्बियाचा संघ टोकियो ऑलिम्पिकसाठी जपानमध्ये दाखल झाला. तेव्हा त्यांची चाचणी करण्यात आली. यात एका खेळाडूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जपानच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने या संदर्भातील वृत्त जपानच्या माध्यमांनी दिले आहे.
अधिकारीने सांगितलं की, कोरोनाची लागण झालेल्या खेळाडूला हनेदा विमानतळावरच संघापासून वेगळे करत आले आहे. त्याच्या सोबत प्रवास केलेल्या चौघांना विमानतळाजवळ असलेल्या हॉटेलमध्ये पाठवण्यात आले आहे. दरम्यान, त्या खेळाडूंना जपानच्या नॅटो येथे सराव शिबिरात भाग घेण्यासाठी जायचे होते.
खेळाडूंचा सराव शिबीर रद्द करण्यात येऊ शकतो, असे देखील त्या अधिकारीने सांगितलं. दरम्यान मागील महिन्यात युगांडाच्या ऑलिम्पिक संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. पण त्या दोन खेळाडू सोडून इतर खेळाडूंना सरावसाठी प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती.
दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकला २३ जुलैपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जगभरातील खेळाडू जपानकडे रवाना होत आहेत.
भारतीय नौकायनपटू नेत्रा टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र
भारतीय महिला नौकायनपटू नेत्रा कुमानन टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. ती टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी भारताची पहिली नाविक आहे. नेत्रा हिने ओमानमध्ये झालेल्या आशियाई क्लालिफायरच्या लेजर रेडियल स्पर्धेत अव्वलस्थान पटकावत टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले. तिने भारताच्याच रम्या सरवनन हिच्यावर २१ अंकांची बढत घेऊन ही कामगिरी केली.
हेही वाचा - जिद्दीला सॅल्युट! शेतात भालाफेक शिकलेली अन्नू राणी टोकियो ऑलिम्पिकला पात्र
हेही वाचा - माना पटेलने रचला इतिहास, टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला जलतरणपटू