बासेल: स्विस ओपनमधील सायना नेहवालचा प्रवास संपुष्टात ( Saina Nehwal journey end ) आला आहे. सायना नेहवालचा मलेशियाच्या किसोना सेल्वादुरेने पराभव केला आहे. त्यामुळे साइना नेहवालचा स्विप ओपनचा प्रवास येथे समानप्त झाला. आता भारताला पीव्ही सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. जे सध्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत.
जागतिक क्रमवारीत 23व्या क्रमांकावर असलेल्या भारतीय खेळाडूने पहिला गेम जिंकला होता. त्यानंतर तिला आपला वेग कायम ठेवता आला नाही. त्यामुळे गुरुवारी रात्री झालेल्या सामन्यात तिला जागतिक क्रमवारीत 64व्या क्रमांकावर असलेल्या किसोना सेल्वादुरेकडून ( Kisona Selvadure of Malaysia ) 21-17, 13-21, 13-21 असा पराभव पत्करावा लागला.
यापूर्वी, दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता पीव्ही सिंधू ( Olympic medalist PV Sindhu ) आणि जागतिक चॅम्पियनशिप रौप्य विजेता किदाम्बी श्रीकांत यांच्यासह चार भारतीय खेळाडूंनी आपापल्या श्रेणींमध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. श्रीकांतची आता दुसऱ्या मानांकित अँडर अँटोन्सेनशी लढत होईल.