हैदराबाद - प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामात आज दोन संघ आपले पहिले सामने खेळणार आहेत. पुणेरी पलटन आणि हरयाणा स्टीलर्स या संघांमध्ये आज लढत होणार असून विजयी आरंभ करण्यासाठी हे दोन्ही संघ सज्ज असतील.
सुरजीत सिंगच्या नेतृत्वाखाली पुणेरी पलटन तर अनुभवी धर्मराज चेरलाथनच्या नेतृत्वाखाली हरयाणा स्टीलर्सचा संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. हैदराबादच्या गच्चीबावली इंडोर स्टेडियममध्ये हा सामना 8.30 वाजता सुरु होईल.
पुणेरी पलटनचा संघ -
- सुरजीत सिंग (कर्णधार), अमित कुमार, दर्शन काडियन, इमाद, सेदाघाटनिया, मनजित, नितीन तोमर, पंकज मोहिते, पवन कुमार काडियन, आर श्रीराम, सुशांत सेल, दीपक यादव, बाळासाहेब शहाजी जाधव, हादी ताजिक, शुभम शिंदे, संकेत सावंत, गिरीश इर्नाक, अमित कुमार, सागक कृष्णा, संदीप
हरयाणा स्टीलर्सचा संघ -
- धर्मराज चेरलाथन (कर्णधार), अमिरहुसैन मलेकी, अरुण कुमार, नवीन, प्रशांत कुमार, सेल्वामनी के, विकास चिल्लर, विकास कांडोला, रवी कुमार, विकास काळे, सुनील, परवीन, सुभाष नरवाल, विक्रम कांडोला, चांद सिंग, कुलदीप सिंग, टीन फोंचू,