ETV Bharat / sports

PM Modi Met Badminton Team : थॉमस कप विजेत्या संघाला भेटले पीएम मोदी, म्हणाले याच उत्कटतेने जायचे आहे पुढे - स्पोर्ट्स न्यूज

भारताने 14 वेळच्या चॅम्पियन इंडोनेशियाचा पराभव करून प्रथमच थॉमस कप जिंकला आणि इतिहासात आपले नाव नोंदवले. लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत यांच्यासह इतर खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. तसेच पंतप्रधानांनी या खेळांडूच्या कामगिरीचे कौतुक केले.

PM Modi
PM Modi
author img

By

Published : May 22, 2022, 4:20 PM IST

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावून इतिहास रचणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंची भेट घेतली (PM Modi met Indian Badminton Team ) आणि ही काही छोटी उपलब्धी नसल्याचे सांगितले. बँकॉक येथील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर फोनवरुन कौतुक केल्यानंतर काही दिवसांनी पंतप्रधान मोदींनी बॅडमिंटन संघाच्या सदस्यांची वैयक्तिक भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. या संघात महिला उबेर कप संघातील खेळाडूंचाही समावेश होता.

मोदी म्हणाले, देशाच्या वतीने मी संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. ही काही छोटी उपलब्धी नाही. तुम्ही करून दाखवलं. एक काळ असा होता की, या स्पर्धांमध्ये आपण इतके मागे पडलो होतो की इथे कोणालाच आपल्याबद्दल माहीत नव्हते. चॅम्पियन शटलर (बॅडमिंटनपटू) यांच्या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी थॉमस चषकाची आठवण करून दिली ( PM recalled the Thomas Cup ) जिथे भारताने विजेतेपदाच्या दावेदार इंडोनेशियाला हरवून सुवर्णपदक जिंकले. अनेक दशकांनंतर भारत या स्पर्धेत आपला झेंडा फडकवू शकला असून ही काही छोटी उपलब्धी नसल्याचे मोदी म्हणाले.

  • #WATCH "I congratulate the whole team on behalf of the nation. This is not a small feat," says PM Narendra Modi during his interaction with badminton champions of the Thomas Cup and Uber Cup

    (Source: DD) pic.twitter.com/dlCv6jYrzm

    — ANI (@ANI) May 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

त्यांनी या संघाच्या प्रयत्नांबद्दल अभिनंदन केले आणि सांगितले की लोकांनी या स्पर्धांकडे यापूर्वी कधीही लक्ष दिले नाही, परंतु थॉमस कपच्या विजयानंतर देशवासीयांनी संघाकडे आणि बॅडमिंटनच्या खेळाकडे पाहिले. 'होय, आम्ही हे करू शकतो' ही वृत्ती आज देशात नवीन शक्ती बनली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. मी तुम्हाला आश्वासन देतो की सरकार खेळाडूंना सर्वतोपरी मदत करेल. वरिष्ठ खेळाडू किदाम्बी श्रीकांतने भारतीय आव्हानाचे नेतृत्व ज्या प्रकारे केले त्याबद्दल पंतप्रधानांनी 29 वर्षीय खेळाडूचे कौतुक केले.

श्रीकांत म्हणाला, सर, मी अभिमानाने सांगू शकतो की जगातील कोणताही खेळाडू याबद्दल बढाई मारू शकत नाही. विजयानंतर लगेचच तुमच्याशी बोलण्याचे सौभाग्य आम्हाला मिळाले. त्याबद्दल सर तुमचे खूप खूप आभार. तो म्हणाला, आम्हाला आमच्या पंतप्रधानांचा पाठिंबा आहे, हे सांगायला खेळाडूंना अभिमान वाटेल. मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद म्हणाले, पंतप्रधान खेळाडू आणि खेळाचे अनुसरण करतात आणि खेळाडूंशी संपर्क साधतात.

डॅनिश दुहेरीचे प्रशिक्षक मॅथियास बो ( Danish doubles coach Matthias Bo ) म्हणाला, "मी एक खेळाडू आहे आणि मी पदकेही जिंकली आहेत, परंतु माझ्या पंतप्रधानांनी मला कधीही भेटीसाठी बोलावले नाही." स्टार शटलर लक्ष्य सेनने पंतप्रधानांना अल्मोडा येथील प्रसिद्ध 'बाल मिठाई' भेट दिली. सेन म्हणाला, अल्मोडाच्या बाल मिठाईबद्दल पंतप्रधान म्हणाले होते आणि मी ती घेऊन आलो. त्यांना खेळाडूंबद्दलच्या छोट्या-छोट्या गोष्टी आठवतात हे मनाला आनंद देणारे आहे.

सेन पंतप्रधानांना म्हणाला, तुम्ही आम्हाला जेव्हाही भेटता, आमच्याशी बोलता, तेव्हा आम्हाला खूप प्रेरणा मिळते. मला आशा आहे की मी भारतासाठी पदके जिंकत राहीन, तुम्हाला भेटत राहीन आणि मिठाई आणत राहीन. पंतप्रधानांनी विचारले की, हरियाणाच्या मातीत असे काय आहे की तेथून एकापाठोपाठ एक दिग्गज खेळाडू उदयास येत आहेत? पंतप्रधानांची भेट घेणाऱ्यांमध्ये महिला शटलर उन्नती हुड्डा ही मूळची हरियाणाची होती.

उन्नती म्हणाली, सर, मला प्रेरणा देणारी गोष्ट म्हणजे, तुम्ही पदक विजेते आणि पदक न जिंकणारे यांच्यात भेदभाव करत नाहीत. दुहेरीतज्ञ सात्विकसाईराज रँकीरेड्डी म्हणाला, गेल्या आठवड्यात विजेतेपद जिंकल्यानंतर खेळाडू पदकांसह झोपले. थॉमस कप फायनलमध्ये भारताने 14 वेळच्या चॅम्पियन इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.

हेही वाचा - Rr Vs Csk : राजस्थान रॉयल्सकडून चेन्नईचा पराभव.. टॉप 2 मध्ये समावेश, गुजरात टायटन्सशी होणार सामना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.