पॅरिस: विश्वविजेत्या फ्रान्सने नेशन्स लीग फुटबॉल सामन्यात ऑस्ट्रियाला 1-1 असे बरोबरीत रोखले ( France held Austria to 1-1 draw ). गतविजेते तीन सामन्यांतून दोन गुणांसह गट एक गुणतालिकेत तळाशी आहेत. सोमवारी त्यांच्या घरच्या मैदानावर फ्रान्सचा क्रोएशियाशी सामना करो या मरोचा असणार आहे. गटातील अन्य लढतीत मारियो पासालीच्या गोलच्या जोरावर क्रोएशियाने डेन्मार्कचा 1-0 असा पराभव केला.
डेन्मार्क सहा गुणांसह पहिल्या क्रमांकावर ( Denmark tops list with six points ) आहे. ऑस्ट्रिया आणि क्रोएशियाचे प्रत्येकी चार गुण आहेत. 37व्या मिनिटाला अँड्रियास वेइमॅनने गोल करत ऑस्ट्रियाला आघाडी मिळवून दिली, मात्र सामन्याच्या 63व्या मिनिटाला अँटोनियो ग्रिजमनच्या जागी मैदानात आलेल्या एमबाप्पेने 83व्या मिनिटाला फ्रान्सला पराभवापासून वाचवले ( Mbappe saved France from defeat ). या 23 वर्षीय खेळाडूचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील हा 27 वा गोल आहे.
-
10 goals in his last 7 international games 🤩
— UEFA Nations League (@EURO2024) June 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
🇫🇷 @KMbappe 👏👏👏#NationsLeague https://t.co/3iic2M700r pic.twitter.com/knMoyXEoD2
">10 goals in his last 7 international games 🤩
— UEFA Nations League (@EURO2024) June 10, 2022
🇫🇷 @KMbappe 👏👏👏#NationsLeague https://t.co/3iic2M700r pic.twitter.com/knMoyXEoD210 goals in his last 7 international games 🤩
— UEFA Nations League (@EURO2024) June 10, 2022
🇫🇷 @KMbappe 👏👏👏#NationsLeague https://t.co/3iic2M700r pic.twitter.com/knMoyXEoD2
सामन्याच्या 87व्या मिनिटाला एमबाप्पेला संघाला आघाडी मिळवून देण्याची संधी होती, पण करीम बेन्झेमाने संधी निर्माण केल्यानंतर त्याची किक गोलपोस्टला लागली. इस्रायलने लीग बी (दुसरे स्तर) च्या त्यांच्या गट दोन सामन्यात मनोर सोलोमनच्या दोन गोलच्या जोरावर अल्बेनियाचा 2-1 पराभव केला.
लीग सीच्या तीन गटात कझाकस्तान आणि बेलारूस 1-1 अशा बरोबरीत सुटले तर स्लोव्हाकियाने अझरबैजानचा 1-0 असा पराभव केला. लीग डी च्या गट एकच्या टेबल-टॉपर्स लॅटव्हियाने मोल्दोव्हाचा 4-2 असा पराभव करून सलग तिसरा विजय नोंदवला.
हेही वाचा - Pragnanandha : ग्रँडमास्टर प्रज्ञानंद यशाच्या शिखरावर; नॉर्वे खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत जेतेपद