नवी दिल्ली - जपानच्या मोतेगी येथे रविवारी झालेल्या जपान ग्रां.पी. स्पर्धेचे विजेतेपद होंडा संघाच्या मार्क मार्क्वेझने पटकावले. गतविजेत्या मार्क्वेझचा हा सलग चौथा विजय असून यंदाच्या मोसमातील त्याचे हे १० वे विजेतेपद आहे.
हेही वाचा - स्टेडियममध्ये वीज पडून खेळाडूचा मृत्यू, दोन युवा खेळाडू बचावले
प्रीमियर क्लास प्रकारात मार्क्वेझने २४ व्या लॅप्सपासून पहिले स्थान राखले होते. जपानमधील प्रीमियर क्लास प्रकारातील हे त्याचे तिसरे विजेतेपद आहे. पेट्रोनास यामाहाच्या फॅबिओ क्वाटरावने द्वितीय क्रमांक मिळविला. तर, आंद्रिया डोविजिओसो तिसऱ्या स्थानावर राहिला आहे.
-
Great job, thanks to all the team! 🙌🏼#JapaneseGP @MotoGP pic.twitter.com/x7Sa92sojv
— Marc Márquez (@marcmarquez93) October 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Great job, thanks to all the team! 🙌🏼#JapaneseGP @MotoGP pic.twitter.com/x7Sa92sojv
— Marc Márquez (@marcmarquez93) October 20, 2019Great job, thanks to all the team! 🙌🏼#JapaneseGP @MotoGP pic.twitter.com/x7Sa92sojv
— Marc Márquez (@marcmarquez93) October 20, 2019
'रणनीती अतिशय स्पष्ट होती. यावेळी मी सुरुवातीपासूनच अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला. मी खूप स्थिर होतो', असे मार्क्वेझने विजेतेपद मिळाल्यावर म्हटले आहे.