ब्राझील - भारतीय नेमबाजपटूंनी ब्राझीलच्या रिओ डि जानेरो येथे सुरु असलेल्या शूटिंग वर्ल्ड कप स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला आहे. या स्पर्धेच्या मिश्र गटात १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात मनु भाकर आणि सौरभ चौधरी या नेमबाजांनीही सुवर्णवेध घेतला आहे.
हेही वाचा - तिसरा सेट न खेळताच जोकोविच पडला स्पर्धेबाहेर
रोमांचक झालेल्या या अंतिम सामन्यामध्ये मनु भाकर आणि सौरभ चौधरी यांच्या जोडीने भारताच्याच यशस्विनी देसवाल आणि अभिषेक वर्माला १७-१५ ने पछाडले. दुसरीकडे, १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या मिश्र गटात अपूर्वी चंदेला आणि दीपक कुमार यांनी सुवर्णपदक मिळवले आहे. याच स्पर्धेत भारताच्या अंजुम मौदिगल आणि दिव्यांश पंवार यांनी कांस्य पदक पटकावले आहे.
-
Indian shooters dominated in Brazil, winning 4 medals in the final day of the World Cup.
— ISSF (@ISSF_Shooting) September 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Two medals were won by athletes from the People’s Republic of China.https://t.co/Z30GF5yO5G pic.twitter.com/q7PUWcjuLx
">Indian shooters dominated in Brazil, winning 4 medals in the final day of the World Cup.
— ISSF (@ISSF_Shooting) September 2, 2019
Two medals were won by athletes from the People’s Republic of China.https://t.co/Z30GF5yO5G pic.twitter.com/q7PUWcjuLxIndian shooters dominated in Brazil, winning 4 medals in the final day of the World Cup.
— ISSF (@ISSF_Shooting) September 2, 2019
Two medals were won by athletes from the People’s Republic of China.https://t.co/Z30GF5yO5G pic.twitter.com/q7PUWcjuLx
या स्पर्धेत केलेल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर भारताने पदकतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. भारताकडे आता नऊ पदके आहेत. त्यामध्ये सहा सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदकांचा समावेश आहे. त्या खालोखाल चीन एक सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्य पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
यशस्विनी देसवालची सुवर्णकामगिरी -
या स्पर्धेत भारताच्या यशस्विनी देसवाल हिने १० मीटर एअर पिस्टल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. या सुवर्णपदकासह यशस्विनी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. तिने अंतिम फेरीत तिने २३६.७ गुण मिळवत ओलेना कोस्तेविचला मागे टाकले. याआधी ईलावेनिल वालारिवानने १० मीटर एअर पिस्टलमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.