नॉर्वे - जगज्जेता खेळाडू मॅग्नस कार्लसनने पुन्हा एकदा बुद्धीबळमधील आपली हुकुमत सिद्ध केली. कार्लसनने यंदाच्या लेजेंड्स बुद्धीबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने रशियाच्या इयान नेपोंनियचीला मात दिली.
पहिल्या दिवशी कार्लसनने पहिला अंतिम सामना ४-२ असा जिंकला. त्यानंतर दुसर्या दिवशी त्याने नेपोंनियचीचा २.५-०.५ असा मोठ्या फरकाने पराभव केला. कार्लसनला ४५००० अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस मिळाले. या विजेतेपदामुळे कार्लसनच्या प्रसिद्धीत वाढ झाली आहे. इतर कोणताही बुद्धीबळपटू कार्लसनच्या आसपास नसल्याचेही म्हटले जात आहे.
विजेतेपद जिंकले असले तरी त्याने खेळात सुधारणा करण्याविषयी मत दिले आहे. कार्लसन म्हणाला, ''सुधारणा करता येणाऱ्या अनेक गोष्टी असतात. आता जे सामने येतील त्यात मला कडव्या प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागेल, म्हणून मला आणखी सुधार करण्याची आवश्यकता आहे. "
मॅग्नस कार्लसन, या दौऱ्यात सुपर फायनल खेळणार आहे. जिथे त्याला प्ले-ऑफमध्ये चीनच्या डिंग लिरेनशी खेळावे लागेल. तर अमेरिकेचा हिकारू नाकामुरा रशियाच्या डॅनियल डुबोव्हविरुद्ध खेळेल.