मुंबई : लिओनेल मेस्सी वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी स्पॅनिश क्लब बार्सिलोनामध्ये दाखल झाला होता. त्यावेळी त्या चिमुकल्याची पूर्ण शारीरिक वाढही झाली नव्हती. मात्र तरीही बार्सिलोनाने त्याच्यासाठी मोठी रक्कम मोजली होती. आज तेच मूल जागतिक फुटबॉलचा जादूगार म्हणून ओळखले जाते! अर्जेंटिनाचा विश्वचषक विजेता कर्णधार लिओनेल मेस्सीचा शनिवारी 36 वा वाढदिवस आहे. तो आता त्याच्या बालपणीच्या क्लबकडून खेळत नसला तरी, मेस्सी आणि अर्जेंटिना मात्र आयुष्यभर एकमेकांना पूरक राहतील.
-
Happy Birthday #Messi𓃵#MessiBirthday pic.twitter.com/ht9ARf30ZV
— Inter Miami CF (@intermiamifc0) June 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Happy Birthday #Messi𓃵#MessiBirthday pic.twitter.com/ht9ARf30ZV
— Inter Miami CF (@intermiamifc0) June 23, 2023Happy Birthday #Messi𓃵#MessiBirthday pic.twitter.com/ht9ARf30ZV
— Inter Miami CF (@intermiamifc0) June 23, 2023
-
Happy birthday Lionel Messi #Messi𓃵 pic.twitter.com/73L9lVrWoc
— Harry (@hazza9990) June 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Happy birthday Lionel Messi #Messi𓃵 pic.twitter.com/73L9lVrWoc
— Harry (@hazza9990) June 23, 2023Happy birthday Lionel Messi #Messi𓃵 pic.twitter.com/73L9lVrWoc
— Harry (@hazza9990) June 23, 2023
2004 मध्ये बार्सिलोनासाठी पदार्पण केले : मेस्सीने 2004 मध्ये बार्सिलोनासाठी पदार्पण केले. पदार्पणातच त्याने त्याचे फुटबॉल कौशल्य दाखवले. मात्र त्यावेळी 16 वर्षीय मेस्सीला संघातील रोनाल्डिन्होसारख्या स्टार्ससमोर फारसे महत्त्व मिळाले नाही. त्यानंतर 2005 मध्ये त्याने अर्जेंटिनाच्या जर्सीमध्ये अंडर-20 विश्वचषकाच्या रुपात पहिली फिफा स्पर्धा जिंकली. त्याच वर्षी ऑगस्टमध्ये लिओ मेस्सीने अर्जेंटिनासाठी पदार्पण केले. त्यानंतर या 'अर्जेंटिनियन वंडर बॉय' ची सर्वत्र चर्चा सुरु झाली. 2006 मध्ये लिओने अर्जेंटिनासाठी विश्वचषकातील सर्वात तरुण फुटबॉलपटू म्हणून पदार्पण केले.
-
Happy birthday Leo Messi. The man who completed football 🐐 pic.twitter.com/YZW45uf2rT
— Barça Worldwide (@BarcaWorldwide) June 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Happy birthday Leo Messi. The man who completed football 🐐 pic.twitter.com/YZW45uf2rT
— Barça Worldwide (@BarcaWorldwide) June 23, 2023Happy birthday Leo Messi. The man who completed football 🐐 pic.twitter.com/YZW45uf2rT
— Barça Worldwide (@BarcaWorldwide) June 23, 2023
बार्सिलोनाचा सर्वात महान खेळाडू बनला : मेस्सीचा जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून खऱ्या अर्थाने प्रवास 2007 मध्ये सुरू झाला. त्याने बार्सिलोनाचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या रिअल माद्रिदविरुद्ध पहिली हॅटट्रिक नोंदवत जागतिक फुटबॉलला आपल्या आगमनाचा संदेश दिला. तो 2004 पासून ते 2021 पर्यंत बार्सिलोनाकडून खेळला. या काळात त्याने क्लबचा आतापर्यंतचा सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून स्वत:ला सिद्ध केले. तसेच एका क्लबसाठी 672 गोल करणारा तो जगातील एकमेव फुटबॉलपटू आहे. इतकेच नाही तर बार्सिलोनासोबतच्या 17 वर्षांच्या कारकिर्दीत मेस्सीने 10 ला लीगा जेतेपदे जिंकली. तसेच या काळात बार्सिलोनाने 4 चॅम्पियन्स लीग, 7 कोपा डेल रे, 8 सुपर डी एस्पाना, 3 क्लब वर्ल्ड कप आणि 3 युरोपियन सुपर कप जिंकले. 2021 मध्ये त्याने जड अंत:करणाने बार्सिलोनाचा निरोप घेतला आणि फ्रेंच लीग वन क्लब पॅरिस सेंट-जर्मनमध्ये दाखल झाला.
-
Happy 36th Birthday The Greatest of All Time. The Little Boy from Rosario. World Champion Lionel Messi ❤️🌍🐐#NewProfilePic pic.twitter.com/tBiKo48c8x
— RI SWAPNO 🐐 (@Rahadul_Islam10) June 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Happy 36th Birthday The Greatest of All Time. The Little Boy from Rosario. World Champion Lionel Messi ❤️🌍🐐#NewProfilePic pic.twitter.com/tBiKo48c8x
— RI SWAPNO 🐐 (@Rahadul_Islam10) June 23, 2023Happy 36th Birthday The Greatest of All Time. The Little Boy from Rosario. World Champion Lionel Messi ❤️🌍🐐#NewProfilePic pic.twitter.com/tBiKo48c8x
— RI SWAPNO 🐐 (@Rahadul_Islam10) June 23, 2023
मेस्सीने जिंकलेले पुरस्कार : पीएसजीकडून 2 वर्षे खेळल्यानंतर मेस्सीचे सध्याचे ठिकाण अमेरिकेतील मेजर लीग सॉकर आहे. मेस्सी तिथे 'इंटर मियामी'च्या जर्सीत दिसणार आहे. ज्याप्रमाणे बार्सिलोनाच्या जर्सीत मेस्सीने क्लबसाठी अनेक विजेतेपदे जिंकली आहेत, त्याचप्रमाणे त्याने वैयक्तिक यशही मोठ्या प्रमाणात मिळवले आहे. प्रतिष्ठेचा बॅलन डी'ओर पुरस्कार 7 वेळा जिंकणारा तो जगातील एकमेव फुटबॉलपटू आहे. लिओनेल मेस्सीने विश्वचषकात 2 वेळा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार, 6 वेळा युरोपियन गोल्डन बूट आणि 2 वेळा गोल्डन बूट जिंकले आहेत.
-
“Lionel Messi has conquered his final peak. Lionel Messi has shaken hands with paradise.
— Kenzo Tenma (@Ajmalmsd7) June 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Happy Birthday Idolo🛐
World Cup Champion Lionel Andres Messi🐐🏆
cc: ShadyCuts🫡 pic.twitter.com/6okAu9Pxrk
">“Lionel Messi has conquered his final peak. Lionel Messi has shaken hands with paradise.
— Kenzo Tenma (@Ajmalmsd7) June 23, 2023
Happy Birthday Idolo🛐
World Cup Champion Lionel Andres Messi🐐🏆
cc: ShadyCuts🫡 pic.twitter.com/6okAu9Pxrk“Lionel Messi has conquered his final peak. Lionel Messi has shaken hands with paradise.
— Kenzo Tenma (@Ajmalmsd7) June 23, 2023
Happy Birthday Idolo🛐
World Cup Champion Lionel Andres Messi🐐🏆
cc: ShadyCuts🫡 pic.twitter.com/6okAu9Pxrk
2022 मध्ये सर्वोच्च यश संपादन केले : अर्जेंटिनाच्या जर्सीमध्ये मेस्सीला कारकिर्दीच्या सुरुवातीला फारसे यश मिळाले नाही. 2014 मध्ये अर्जेंटिना विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता, मात्र फायनलमध्ये अर्जेंटिनाला जर्मनीविरुद्ध 1-0 असा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर मेस्सीने तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर तो निवृत्तीतून परतला आणि 2021 मध्ये प्रथमच कोपा अमेरिका स्पर्धा जिंकली. ही मेस्सीची अर्जेटिनाच्या जर्सीतील पहिली आतंरराष्ट्रीय ट्रॉफी होती. 18 डिसेंबर 2022 रोजी लिओनेल मेस्सीने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च यश संपादन केले. कर्णधार म्हणून त्याने कतारमध्ये विश्वचषक स्पर्धा जिंकली आणि इतिहासातील सर्वात महान फुटबॉलपटू म्हणून आपले नाव निश्चित केले.
हेही वाचा :
- Raina Restaurant : सुरेश रैना युरोपातील लोकांना भारतीय पदार्थ घालणार खाऊ! अॅमस्टरडॅममध्ये उघडले रेस्टॉरंट
- India Tour Of West Indies : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा ; पुजाराला डच्चू, अजिंक्य रहाणे उपकर्णधार
- Womens Junior Hockey World Cup : महिला ज्युनियर हॉकी विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, भारताचा पहिला सामना कॅनडाविरुद्ध