ETV Bharat / sports

Kolhapur Wrestlers : कोल्हापूरच्या कुस्तीपटूंना अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्राची गरज - कुस्ती प्रशिक्षक कृष्णात पाटील

कोल्हापूरला देशभरात कुस्तीपंढरी म्हणून ओळखले जाते. याच कोल्हापूरात अनेक महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पैलवान घडले आहेत. आजही देशभरातील मुलं कोल्हापूरच्या मातीत कुस्तीचे धडे गिरवताना दिसतात. आता या कुस्तीपंढरीला अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रांची गरज आहे.

author img

By

Published : Apr 20, 2022, 7:54 PM IST

Khasbaug
Khasbaug

कोल्हापूर: कोल्हापूरला देशभरात कुस्तीपंढरी म्हणून ओळखले जाते. याच कोल्हापूरात अनेक महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पैलवान घडले आहेत. आजही देशभरातील मुलं कोल्हापूरच्या मातीत कुस्तीचे धडे गिरवताना दिसतात. असे असले तरी तब्बल 21 वर्षांपासून कोल्हापूरच्या मातीला महाराष्ट्र केसरीची ( Maharashtra Kesari ) प्रतीक्षा होती, ती यावर्षी पृथ्वीराज पाटील याच्या रूपाने पूर्ण झाली. कोल्हापूरात अनेक मातब्बर मल्ल आहेत, तरीही महाराष्ट्र केसरी सारख्या स्पर्धांमध्ये यश मिळवायला इतकी प्रतीक्षा का करावी लागली ? काय आहेत याची कारणे ? आणि आता प्रशासनाने काय केले पाहिजे याबाबतचाच विशेष रिपोर्ट.

कोल्हापूरच्या कुस्तीपटूंना अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रांची गरज

अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्राची उभारणी गरजेची - कोल्हापूरात आजपर्यंत अनेक पैलवान घडले आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्थरावर आपली चमक दाखवत आहेत. काही जण तर ऑलम्पिकमध्येही गेले आहेत. मात्र या कुस्ती पंढरीत ज्या पद्धतीने इतर काही शहरांमध्ये अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्राची निर्मिती झाली आहे, ती इथे झाली नाहीये. शासनाने यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे क्रीडा प्रबोधिनीचे कुस्ती प्रशिक्षक कृष्णात पाटील आणि क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांनी म्हंटले आहे. ट्रेनिंग सेंटर असल्यावर पैलवानांना जे तालमीमध्ये शिकायला मिळते, त्यापेक्षा अजूनही अत्याधुनिक गोष्टींचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या पुढच्या कामगिरीमध्ये ही विशेष असे यश मिळताना पाहायला मिळेल असेही त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रामध्ये सायकॉलॉजी, न्यूट्रेशन, स्टीम बाथ, फिजिओथेरपी, मसाजर अशा अनेक सुविधा पैलवांना घेता येतात, शिवाय प्रशिक्षक सुद्धा चांगल्या दर्जाचे मिळाले तर त्यांचा भविष्यात या पैलवानांना खूप फायदा होईल, असेही यावेळी कृष्णात पाटील ( Wrestling coach Krishnat Patil ) म्हणाले.

खासबाग मैदानाची दुरावस्था ( Khasbaug ground Bad condition ) - दरम्यान, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला ( Jarshi Chhatrapati Shahu Maharaj ) राजाश्रय दिला होता. शिवाय भव्य दिव्य असे खासबाग मैदान बनवले होते. आजही हे मैदान अतिशय भक्कम आणि सुस्थितीत आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून याकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत चालले आहे. याबाबत नेहमीच स्थानिक तसेच जागरूक नागरिक प्रशासनाला जाग आणत आले आहेत. सध्यातर या मैदानात जवळपास 5 फुटांपर्यंत गवत उगवल्याचे चित्र पाहायला मिळते. केवळ गवत काढणे म्हणजे प्रशासनाचे काम संपले असे नाही, तर या मैदानाची योग्य काळजी घेऊन शाहू महाराजांचा हा कृतिशील वारसा सुद्धा जपला पाहिजे. जेणेकरून भावी पिढीला हे वैभव तेंव्हा सुद्धा पाहता येईल, असेही यावेळी अरुण पाटील म्हणाले.

फक्त कुस्ती शिकून उपयोग नाही, अनेक स्पर्धांचे आयोजन करणे गरजेचे - क्रीडा अधिकारी अरुण पाटील म्हणाले, एकेकाळी कोल्हापूरातील खासबाग मैदानात दर शनिवारी भव्य असे कुस्त्यांचे मैदान भरायचे. लोकं तिकीट काढून या ठिकाणी कुस्ती पाहण्यासाठी गर्दी करायचे. त्यावेळी कुस्तीला केवळ राजाश्रय नव्हता, तर लोकाश्रय सुद्धा होता. त्यामुळेच कोल्हापूरच्या मल्लांचा देशभरात एक वेगळा दबदबा होता. हेच दिवस जर परत बघायचे असतील, तर नेहमी कुस्त्यांच्या स्पर्धा घेण्याची गरज आहे. केवळ अभ्यास करायचा आणि परीक्षाच जर होत नसेल, तर त्या अभ्यासाचा काय उपयोग अशी परिस्थिती विद्यार्थ्यांची होते, तशीच परिस्थिती पैलवानांची आहे. अनेक मोठ्या कुस्त्यांची मैदाने इथे भरविली पाहिजे. मग ती प्रशासनाकडून असुदेत किंव्हा जिल्ह्यातील अनेक कारखाने आणि सहकारी संस्था आणि अनेक नेते मंडळी आहेत, त्यांच्या मार्फत या गोष्टी शक्य होऊ शकतात. त्यामुळे पुन्हा एकदा तो राजाश्रय आणि लोकाश्रय पैलवानांना मिळेल. एव्हडेच नाही तर वारंवार स्पर्धांचे आयोजन झाल्याने पैलवांना स्वतः कशामध्ये आपण कमी पडत आहोत, याचा अभ्यास होतो त्यामुळे हे बदल होणे आवश्यक असल्याचेही अरुण पाटील ( Sports Officer Arun Patil ) म्हणाले.

पृथ्वीराज पाटील'ला ऑलंम्पिक साठी शुभेच्छा - पृथ्वीराज पाटील ( Maharashtra Kesari Prithviraj Patil ) याच्या रूपाने कोल्हापूर जिल्ह्यातील 21 वर्षांचा दुष्काळ मिटला असून महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापूरात आली आहे. त्यामुळे कोल्हापूरातील कुस्तीपटूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. अनेक नवीन मुलं आता कुस्तीमध्ये उतरत आहेत, असेही यावेळी कुस्ती प्रशिक्षक कृष्णात पाटील यांनी म्हंटले. शिवाय पृथ्वीराज प्रमाणे अनेकजण आता त्याची प्रेरणा घेऊन अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवतील. पृथ्वीराजने सुद्धा आता यामध्ये न थांबता ऑलम्पिकसाठी तयारी सुरू ठेवावी आणि ऑलम्पिकमध्येही गोल्ड मेडल मिळवून संपूर्ण कोल्हापूरची मान अभिमानाने उंचावावी, असेही पाटील म्हणाले.

हेही वाचा - Hassan Mushrif Replied To Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही - हसन मुश्रीफ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.