नवी दिल्ली - भारताचा स्टार भालाफेकपटूल नीरज चोप्रा आगामी ऑलिम्पिकमध्ये पूर्णपणे आपले लक्ष केंद्रित करण्यासाठी मोबाइल फोनपासून दूर राहील. नीरजच्या काकांनी रविवारी याबाबत माहिती दिली. नीरजचे काका भीम चोप्रा म्हणाले, "टोकियो ऑलिम्पिक सुरू होण्यास १४० पेक्षा कमी दिवस शिल्लक आहेत. ऑलिम्पिकवर त्याचे लक्ष केंद्रित करणे चांगले आहे. आम्ही त्याला जास्त त्रास देत नाही."
पटियाला येथील इंडियन ग्रँड प्रिक्सच्या तिसर्या टप्प्यात २३ वर्षीय नीरजने ८८.०७मीटर भाला फेकत स्वत:चा विक्रम मोडित काढला. ही नीरजची आत्तापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. कोरोनामुळे एका वर्षाहून अधिक काळानंतर प्रथमच स्पर्धेत भाग घेणाऱ्या चोप्राने पाचव्या प्रयत्नात हा विक्रम नोंदवला. २०१८च्या आशियाई स्पर्धेत त्याने ८८.०६ मीटर भाला फेकत राष्ट्रीय विक्रम केला होता.
नीरज ट्विटर हँडलवर सक्रिय असतो. गेल्या महिन्यात त्याने भुवनेश्वरच्या कलिंग स्टेडियमवर आपल्या सरावाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्याच्याशिवाय शिवपाल सिंगनेही टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता दर्शविली आहे.
हेही वाचा - रोम रँकिंग सीरिज : बजरंग पुनियाची अंतिम सामन्यात धडक