नवी दिल्ली - भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी 23 जून रोजी देशवासियांना ऑलिम्पिक दिन साजरा करण्याची विनंती केली आहे. 1948 नंतर दरवर्षी 23 जून रोजी ऑलिम्पिक दिन साजरा केला जातो. ''खेळ पाहणारा देश ते खेळात भाग घेणारा देश असा प्रवास करण्यासाठी भारताला असे टप्पे लक्षात ठेवण्याची गरज आहे'', असे ते म्हणाले.
बत्रा म्हणाले, ''सक्रिय खेळात भाग घेणाऱ्या देशांकडे घेऊन जाण्याचा हा मार्ग आहे. ऑलिम्पिक समुदायाच्या आसपासच्या लोकांना त्यांना आवडणारा कोणताही खेळ खेळण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. मी भारताच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या आणि इतर खेळाडूंना उत्सवाचे नेतृत्व करण्यास उद्युक्त करतो. मला खात्री आहे की राष्ट्रीय क्रीडा महासंघ आणि राज्य ऑलिम्पिक असोसिएशन देखील त्यांच्या खेळाडूंना आणि कर्मचाऱ्यांना या दिनासाठी प्रेरित करेल."
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती आणि जागतिक बॅडमिंटन चॅम्पियन पी.व्ही. सिंधु आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेती महिला कुस्तीपटू विनेश फोगट येत्या 23 जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) ऑलिम्पिक दिन कार्यक्रमात भाग घेतील.