रिओ दी जनैरो - ब्राझील येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशनच्या (आयएसएसएफ) जागतिक स्पर्धेत भारताच्या ईलावेलिन वालारिवन हिने सुवर्णपदक मिळवले. ईलावेलिन हिने चमकदार कामगिरी करत (२५१.७गुण) महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात पदक मिळवले.
वरिष्ठ गटात सहभागी होण्याचे २० वर्षीय ईलावेलिनचे हे पहिलेच वर्ष आहे. चंदेला आणि अंजली भागवत नंतर आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण मिळवणारी ईलावेलिन तिसरी खेळाडू आहे. अंजुम मुदगिल आणि अपूर्वी चंदेला यांना पदक मिळवण्यात यश आले नाही. त्यांना अनुक्रमे सहाव्या आणि अकराव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
-
#NationalSportsDay gets sweeter. @elavalarivan wins her first senior World Cup🥇on the day GNSPF’s efforts are recognised through the Rashtriya Khel Protsahan Puraskar! Thanking the universe! @narendramodi @KirenRijiju @Media_SAI @RaninderSingh @OfficialNRAI pic.twitter.com/tw1Yv1X3bT
— Gagan Narang (@gaGunNarang) August 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#NationalSportsDay gets sweeter. @elavalarivan wins her first senior World Cup🥇on the day GNSPF’s efforts are recognised through the Rashtriya Khel Protsahan Puraskar! Thanking the universe! @narendramodi @KirenRijiju @Media_SAI @RaninderSingh @OfficialNRAI pic.twitter.com/tw1Yv1X3bT
— Gagan Narang (@gaGunNarang) August 28, 2019#NationalSportsDay gets sweeter. @elavalarivan wins her first senior World Cup🥇on the day GNSPF’s efforts are recognised through the Rashtriya Khel Protsahan Puraskar! Thanking the universe! @narendramodi @KirenRijiju @Media_SAI @RaninderSingh @OfficialNRAI pic.twitter.com/tw1Yv1X3bT
— Gagan Narang (@gaGunNarang) August 28, 2019
ईलावेलिनच्या यशाबद्दल ऑलिम्पिक पदक विजेता गगन नारंगने ट्विटरवर शुभेच्छा दिल्या. 'ईलावेलिनच्या सुवर्ण पदकामुळे राष्ट्रीय खेळ दिवस आणखी चांगला झाला. योगायोगाने याच दिवशी जीएनएसएफ (गगन नारंग स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशन) ला राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्काराने गौरवण्यात येत आहे,' असे गगन नारंगने म्हटले आहे.