नवी दिल्ली - राजधानीत सुरू असलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत शनिवारी पाचव्या दिवशी भारताने १ सुवर्ण आणि ३ रौप्य पदके पटकावली. पुरुषांच्या ५७ किलो खुल्या गटात रवी दाहियाने तजाकिस्तानच्या हिकमतुलो वोहिदोवला चितपट करत सुवर्णपदक जिंकले. तर बजरंग पुनिया, गौरव बलियान आणि सत्यवर्त कादियान यांना अंतिम सामन्यात पराभव पत्कारावा लागल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
ऑलिंपिकमध्ये भारताकडून आशा असलेला बंजरंग पुनिया ६५ किलो वजनी गटात जपानच्या टाकुटो ओटोगुरोकडून पराभूत झाला. २-१० अशा फरकाने टोकुटोने त्याला नमवले. तर ९७ किलो वजनी गटात इराणच्या मोजताबा मोहम्मदशाफी गोलेइजने भारताच्या सत्यवर्त कादियानला चितपट केले. ७९ किलो वजनी गटात गौरव बलियानला किर्गिझस्तानच्या अरसलन बुढाझापोव्हलाकडून पराभव स्वीकारावा लागला.
हेही वाचा - आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप : भारताच्या तीन महिला कुस्तीपटूंना सुवर्णपदके
हेही वाचा - न्यूझीलंडची १८३ धावांची आघाडी; दुसऱ्या डावात भारताची सावध सुरुवात