नागपूर : भारताने 400 धावांवर डाव घोषित केल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेला ऑस्ट्रेलियाचा संघ दयनीय स्थितीत पोहचली. रविचंद्रन अश्विनची फिरकीची जादू काही थांबायचे नाव घेत नाही. अश्विनने ऑस्ट्रेलिया संघाची वरची फळी अक्षरशः कापून काढली. त्यानंतर उरलेली कामगिरी जडेजा आणि शमीने चोख बजावत उरले-सुरलेले फलंदाज तंबूत पाठवले. ऑस्ट्रेलिया अवघ्या 91 धावांवर ऑलआऊट झाल्याने भारताने 1 डाव राखून 132 धावांना दणदणीत विजय मिळवला.
-
That moment when you get the DRS right! 🙌🏻
— BCCI (@BCCI) February 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
There's no stopping #TeamIndia today!
Follow the match ▶️ https://t.co/SwTGoyHfZx#TeamIndia | #INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/ixZz5hU5qq
">That moment when you get the DRS right! 🙌🏻
— BCCI (@BCCI) February 11, 2023
There's no stopping #TeamIndia today!
Follow the match ▶️ https://t.co/SwTGoyHfZx#TeamIndia | #INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/ixZz5hU5qqThat moment when you get the DRS right! 🙌🏻
— BCCI (@BCCI) February 11, 2023
There's no stopping #TeamIndia today!
Follow the match ▶️ https://t.co/SwTGoyHfZx#TeamIndia | #INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/ixZz5hU5qq
भारतीय गोलंदाजांची शानदार गोलंदाजी : ऑस्ट्रेलियन फलंदाज एकामागोमाग तंबूत परतत होते. इकडे रविचंद्रन अश्विनच्या माऱ्यापुढे कांगारू हैराण झाले होते. डेव्हीड वाॅर्नरला रविचंद्रनने एलबीडब्ल्यू केल्यानंतर तिकडे जडेजानेसुद्धा मारनेस लबुनशेनला पायचीत केले. मॅट रेनशाॅ ( 2) अवघ्या 2 धावांवर अश्विनकडून पायचित झाला. पेटर हॅंडकोम्बलासुद्धा काही सुधारले नाही, तो 6 धावांवर असताना अश्विनने त्याला एबबीडब्ल्यू केले. एलेक्स केरी (10) सुद्धा एलबीडब्ल्यू करून तंबूत पाठवले. त्यानंतर जडेजा, शमी, यांनीसुद्धा त्यांची कामगिरी चोख बजावत बाकीच्या फलंदाजांना पॅव्हीलीनचा रस्ता दाखवला.
-
1ST Test. WICKET! 19.2: Alex Carey 10(6) lbw Ravichandran Ashwin, Australia 64/6 https://t.co/SwTGoyHfZx #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) February 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">1ST Test. WICKET! 19.2: Alex Carey 10(6) lbw Ravichandran Ashwin, Australia 64/6 https://t.co/SwTGoyHfZx #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) February 11, 20231ST Test. WICKET! 19.2: Alex Carey 10(6) lbw Ravichandran Ashwin, Australia 64/6 https://t.co/SwTGoyHfZx #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) February 11, 2023
भारतीय संघाचा डाव : दुसऱ्या दिवसाचा (शुक्रवार) खेळ संपेपर्यंत भारताने सात विकेट्सवर 321 धावा केल्या होत्या आणि ऑस्ट्रेलियावर 144 धावांची आघाडी घेतली होती. आज रवींद्र जडेजा (66) आणि अक्षर पटेल (52) खेळत होते. रवींद्र जडेजाने शानदार खेळी करीत 185 चेंडूत 70 धावा केल्या, तर अक्षर पटेलने 184 चेंडूत 84 धावांची मोठी खेळी केली. त्यामुळे भारतीय संघाच्या धावसंख्येला आकार आला. आज भारतीय संघाचा डाव 400 धावांवर संपुष्टात आला.
-
An all-round match-winning performance to mark a memorable return! 🙌🏻@imjadeja becomes the Player of the Match as #TeamIndia win by an innings & 132 runs 👏🏻
— BCCI (@BCCI) February 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard ▶️ https://t.co/SwTGoyHfZx…#INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/VBGfjqB4dZ
">An all-round match-winning performance to mark a memorable return! 🙌🏻@imjadeja becomes the Player of the Match as #TeamIndia win by an innings & 132 runs 👏🏻
— BCCI (@BCCI) February 11, 2023
Scorecard ▶️ https://t.co/SwTGoyHfZx…#INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/VBGfjqB4dZAn all-round match-winning performance to mark a memorable return! 🙌🏻@imjadeja becomes the Player of the Match as #TeamIndia win by an innings & 132 runs 👏🏻
— BCCI (@BCCI) February 11, 2023
Scorecard ▶️ https://t.co/SwTGoyHfZx…#INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/VBGfjqB4dZ
जडेजा आणि अक्षर पटेलच्या जोडीची उत्तम फलंदाजी : जडेजाने 18वे आणि पटेलने दुसरे अर्धशतक झळकावले. रवींद्र जडेजाने 114 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. जडेजाचे हे कसोटीतील 18 वे अर्धशतक आहे. पाच महिन्यांनंतर कसोटीत पुनरागमन करणाऱ्या जडेजानेही पाच बळी घेतले आहेत. अक्षर पटेलने 94 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. पटेलचे हे कसोटीतील दुसरे अर्धशतक आहे. रवींद्र जडेजाने 185 चेंडूत 70 धावा, तर अक्षर पटेलने 174 चेंडूत 84 धावा केल्या.
-
A splendid five-wicket haul in the second innings from @ashwinravi99 inspires #TeamIndia to a comprehensive victory in the first #INDvAUS Test 🙌🏻
— BCCI (@BCCI) February 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard ▶️ https://t.co/SwTGoyHfZx…#INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/wvecdm80k1
">A splendid five-wicket haul in the second innings from @ashwinravi99 inspires #TeamIndia to a comprehensive victory in the first #INDvAUS Test 🙌🏻
— BCCI (@BCCI) February 11, 2023
Scorecard ▶️ https://t.co/SwTGoyHfZx…#INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/wvecdm80k1A splendid five-wicket haul in the second innings from @ashwinravi99 inspires #TeamIndia to a comprehensive victory in the first #INDvAUS Test 🙌🏻
— BCCI (@BCCI) February 11, 2023
Scorecard ▶️ https://t.co/SwTGoyHfZx…#INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/wvecdm80k1
दुसऱ्या दिवसाचा डाव : आजच्या डावाची सुरुवात झाल्यानंतर मर्फीने जोरदार बाॅलिंग करीत 2 विकेट घेतल्या. सायंकाळचा रखवालदार रविचंद्रन अश्विन याने 62 चेंडूत 23 धावा करुन मर्फीकडून तो एलबीडब्ल्यू झाला. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजारा अवघ्या 7 धावा असताना बोलान्डने त्याचा मर्फीच्या चेंडूवर झेल घेतला. आता सध्या विराट 12 धावांवर खेळत आहे. रोहित शर्मा 85 धावांवर खेळत आहे. त्याने 142 चेंडूची शानदार पारी खेळली आहे. सध्या तो खेळत आहे. मर्फीने जोरदार बाॅलिंग करीत 3 विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या दिवशीचा डाव संपला तेव्हा टीम इंडियाच्या 7 विकेटवर 321 धावा होत्या.
ऑस्ट्रेलियाकडून मर्फीची शानदार बाॅलिंग : कसोटीत पदार्पण करणाऱ्या टॉड मर्फीने ऑस्ट्रेलियाकडून शानदार गोलंदाजी केली. त्याने भारतीय संघाच्या सलामीवर केएल राहुल (20) काॅट अॅंड बाॅल्ड करीत तंबूत पाठवून, भारतीय संघाला पहिला सुरुंग लावला. त्यानंतर मर्फीची तोफ थांबलीच नाही. त्याने लागोपाठ आर अश्विन (23), चेतेश्वर पुजारा (7), विराट कोहली (12) यांना बाद करून भारतीय संघाची मधली फळी कापून काढली. त्यानंतर आलेल्या नवख्या केएस भरत (8) देखील बाद करून भारतीय संघाचा कणाच मोडला. भारतीय संघाची बाजू संभाळणाऱ्या रवींद्र जडेजाला (70) सुद्धा त्याने त्रिफळा उडवून मैदानाबाहेर पाठवले
ऑस्ट्रेलिया गोलंदाजांची सुंदर कामगिरी : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या ( 120) यष्टी उडवल्या. नॅथन लायनने भारताचा तडाखेबंद फलंदाज सूर्यकुमार यादवला (8) त्रिफळा उडवून तंबूत धाडले. महत्त्वाची विकेट रोहित शर्मा, रवींद्र जडेजा हे बाद झाल्यानंतर भारतीय संघाची बाजू लढवणाऱ्या अक्षर पटेलला कमिन्सने क्लिन बोल्ड करून भारताचा डाव संपुष्टाता आणला. भारतीय संघ 400 धावांवर संपुष्टात आला.
हेही वाचा : Ind Vs Aus : अष्टपैलू जडेजावर बॉल टॅम्परिंगच्या आरोप; ब्रॅड हॉगचा रवींद्र जडेजाला पाठिंबा