ETV Bharat / sports

हॅमिल्टनचा झंझावात; दिग्गज शुमाकरला टाकले मागे

हॅमिल्टन सुरुवातीला संघर्ष करत होता आणि त्यांच्या संघातील सहकारी वाल्टेरी बोटास पुढे निघून गेला. यात पावसालाही सुरूवात झाली. पहिल्या लॅपमध्ये पुढे निघाल्यानंतर बोटासला मैक्लारेनच्या कार्लोस सैंजने मागे टाकले.

author img

By

Published : Oct 26, 2020, 2:56 AM IST

Updated : Oct 26, 2020, 4:13 AM IST

hamilton
हॅमिल्टन

पोर्तिमाओ : ब्रिटिश चालक लुईस हॅमिल्टनने पोर्तुगाल ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकून रविवारी फॉर्मूला वनचा नविन इतिहास रचला. त्याने त्याचा कारकिर्दीतील 92वा विजय मिळवत जर्मनीचा महान चालक माइकल शुमाकरच्या विक्रमाला मागे टाकत नविन विक्रमाची नोंद केली

हॅमिल्टन सुरुवातीला संघर्ष करत होता आणि त्यांच्या संघातील सहकारी वाल्टेरी बोटास पुढे निघून गेला. यात पावसालाही सुरूवात झाली. पहिल्या लॅपमध्ये पुढे निघाल्यानंतर बोटासला मैक्लारेनच्या कार्लोस सैंजने मागे टाकले.

बोटास सहाव्या लॅपमध्ये पुन्हा पुढे निघाला आणि हॅमिल्टननेदेखील कार्लोसला मागे टाकले. यावेळी पाऊस थांबला होता. हॅमिल्टनने शेवटी 20व्या लॅपमध्ये बोटासलाही मागे टाकले. तो बोटासच्या 10 सेकंद पुढे होता. बोटास खूप प्रयत्न करत होता. मात्र, शेवटी हॅमिल्टनने विजय मिळवला.

हॅमिल्टन मर्सिडीजचा आपला सहकारी चालक वाल्टेरी बोटासपेक्षा 25.6 सेकंद पुढे राहिला. तर रेडबुलचा मैक्स वेरस्टाप्पेन तिसऱ्या स्थानावर राहिला. हॅमिल्टनने सर्वात वेगवान लॅप काढून अतिरिक्त गुणदेखील मिळवले आणि आता चैम्पियनशिप तालिकेत बोटासवर त्याने 77 गुणांची आघाडी घेतली आहे. हॅमिल्टनने पहिली एफवन रेस 2007 मध्ये जिंकली होती. तर पहिला किताब 2008 मध्ये आपल्या नावावर केला. तो 2013 मध्ये मर्सिडीजसोबत जुळला आणि तिथूनच्या त्याच्या करिअरचा विकास झाला.

तो पाच एफवन किताब जिंकला आहे. तर शूमाकरच्या नावावर सात किताब आहेत. शेवटच्या रेसआधी लुईस हॅमिल्टनने पोर्तुगाल ग्रँड प्रिक्समध्ये विक्रम करत 97व्यांदा पोल पोजिशन मिळवली होती.

Last Updated : Oct 26, 2020, 4:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.