ETV Bharat / sports

FIFA World Cup 2022 : फिफा फुटबाॅलमध्ये आज डाव पलटला; सौदी अरेबियाकडून बलाढ्य अर्जेंटिनाचा 2-1 ने पराभव

फिफा वर्ल्ड कप 2022 मध्ये सौदी अरेबिया संघाने अर्जेंटीनाचा 2-1 ने पराभव ( Saudi Arabia Beat Argentina ) करून मोठा चमत्कार केला ( Argentina lose to Saudi Arabia ) आहे. बलाढ्य अर्जेंटिनाचा 2-1 ने पराभव करून सौदीने आपली ताकद दाखवली आहे. अर्जेंटिनाच्या मेस्सी 10 व्या मिनिटाला गोल करीत अर्जेंटीनाला 1-0 ची आघाडी मिळवून दिली होती. परंतु फा

FIFA World Cup 2022
सौदी अरेबियाकडून बलाढ्य अर्जेंटिनाचा 2-1 ने पराभव
author img

By

Published : Nov 22, 2022, 6:42 PM IST

फिफा वर्ल्ड कप 2022 : फिफा विश्वचषक 2022 मध्ये आज मोठा चमत्कार पाहायला ( Argentina lose to Saudi Arabia ) मिळाला. आज एक मोठा उलटफेर सामन्यात घडला. फुटबॉल जगतातील स्टार फुटबॉलर लिओनल मेस्सी ( Lionel MessI ) हा अर्जेंटिना संघाला घेऊन मैदानात उतरला होता. कमाल फॉर्मात असूनही अर्जेंटिनाला त्यांच्या तुलनेत दुबळ्या सौदी अरेबिया (ARG vs KSA) संघाने मात दिली आहे. 2-1 च्या फरकाने अर्जेंटिनाने सामना ( Saudi Arabia Beat Argentina ) गमावला आहे.

अर्जेंटिना संघाचा मागील फाॅर्म जबदस्त असताना : विशेष म्हणजे अर्जेंटिना संघाने कोपा अमेरिका ही मोठी स्पर्धा जिंकल्यानंतर कमाल फॉर्म दाखवत खेळ केला होता. त्यांनी मागील 36 सामन्यांपासून पराभव पाहिला नव्हता. पण विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेतच त्यांना सलामीचा सामना गमवावा लागला आहे. सामन्यात अर्जेंटिनाकडून लिओनल मेस्सीने (10 मिनिटं) पेनल्टीच्या मदतीनं एक गोलं केला. तर सौदीकडून सालेह अल्सेरीनं (48 मिनिटं) आणि सालेम अल्डवेसरीनं (53 मिनिटं) गोलं केले.

मेस्सीच्या अर्जेंटिना संघाचा फॉर्म पाहता ते सहज सामना जिंकतील अशी आशा असताना......

सामन्याचा विचार करता सामना सुरु होण्यापूर्वी मेस्सीच्या अर्जेंटिना संघाचा फॉर्म पाहता ते सहज सामना जिंकतील असे वाटत होते. त्यांनी सुरुवातही चांगली केली. मेस्सीने 10 व्या मिनिटांला पेनल्टीच्या मदतीनं गोल करीत खातं उघडले. त्यानंतर दोन्ही संघ अटीतटीचा खेळ करीत होते. हाल्फ टाईमपर्यंत 1-0 च्या स्कोरने अर्जेंटिना आघाडीवर होता.

सौदीने हाफ टाईमनंतर दाखवला कमालीचा खेळ : हाल्फ टाईमनंतर सौदीने आपला खेळ कमालीचा सुधारत 48 व्या मिनिटाला गोल केला. सालेह अल्सेरीनं हा गोल करीत सामन्यात बरोबरी साधली. काही वेळातच 53 व्या मिनिटाला सालेम अल्डवेसरीनं गोल करीत सौदीची आघाडी 2-1 अशी केली. ज्यानंतर अर्जेंटिना संघाने बरेच प्रयत्न केले. पण सौदीच्या दमदार डिफेन्समुळे तर कधी ऑफसाईडमुळे त्यांना गोल करता आले नाही. ज्यानंतर अखेर सामना संपताना 2-1 अशा स्कोरने सौदीने सामना जिंकला.

या विजयासह सौदी अरेबिया संघाने ग्रुप C मध्ये पहिला विजय मिळवत अव्वल स्थान मिळवलं आहे. त्यांच्या नावावर 3 गुण आले आहेत. दरम्यान ग्रुपमधील स्टार संघ अर्जेंटिना मात्र अडचणीत दिसत आहे. अर्जेंटिनाचा पुढील सामना 27 नोव्हेंबर रोजी मेक्सिकोविरुद्ध खेळवला जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.